पुणे। फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी तर्फे आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत टायगर्स, लायन्स या संघांनी अनुक्रमे एफसी बिटल्स व टेनिस नट्स फेडल या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या सामन्यात टायगर्स संघाने एफसी बिटल्ससंघाचा 24-07 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सामन्यात 100अधिक गटात टायगर्सच्या ऋतू कुलकर्णी व प्रशांत गोसावी याने एफसी बिटल्सच्या श्रीवर्धन सुखात्मे व शैलेश पटवर्धनचा 6-1 असा तर, 90 अधिक गटात टायगर्सच्या योगेश पंतसचिव व अमित लाटे यांनी एफसी बिटल्सच्या रोहित शेवाळे व अशोक अगरवाल यांचा 6-0 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात टायगर्सच्या केदार शहा व अभिषेक ताम्हाणे या जोडीने एफसी बिटल्सच्या श्रेयस गजेंद्रगडकर व अभिषेक फडतरे यांचा 6-2 तर, खुल्या गटात टायगर्सच्या अनुप मिंडा व ऋतू कुलकर्णी यांनी वैभव अवघडे व गणेश देवखिळे यांचा 6-4 असा पराभव करून संघाला विजय मिळवू दिला.
दुसऱ्या सामन्यात लायन्स संघाने टेनिस नट्स फेडलचा 20-15 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
लायन्स वि.वि.टेनिस नट्स फेडल 20-15(100अधिक गट: रोहन दळवी/राजू साठे वि.वि.श्रेशा भट/अमित किंडो 6-4; 90 अधिक गट: अमित नाटेकर/राहुल मुथा वि.वि.जॉय बॅनर्जी/दिपक पाटील 6-3; खुला गट: नरहर गर्गे/रघुनंदन बेहरे वि.वि.वेंकटेश आचार्य/भूषण देसाई 6-2; खुला गट: रोहन दळवी/सारंग पाबळकर पराभूत वि.अमित किंडो/रवी कोठारी 2-6);
टायगर्स वि.वि.एफसी बिटल्स 24-07(100अधिक गट: ऋतू कुलकर्णी/प्रशांत गोसावी वि.वि.श्रीवर्धन सुखात्मे/शैलेश पटवर्धन 6-1; 90 अधिक गट: योगेश पंतसचिव/अमित लाटे वि.वि.रोहित शेवाळे/अशोक अगरवाल 6-0; खुला गट: केदार शहा/अभिषेक ताम्हाणे वि.वि.श्रेयस गजेंद्रगडकर/अभिषेक फडतरे 6-2; खुला गट: अनुप मिंडा/ऋतू कुलकर्णी वि.वि.वैभव अवघडे/गणेश देवखिळे 6-4).
महत्त्वाच्या बातम्या –
राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा : मोनाली नातू पुणे संघाची कर्णधार
टीम इंडिया विजयीरथावर आरुढ! सलग १२ वा टी२० सामना जिंकत ‘या’ दोन संघांची विश्वविक्रमात बरोबरी