---Advertisement---

फलंदाजीमुळे सर्वांच्या मनात भरलेल्या तिलक वर्माची पव्हेलियनमध्ये परतताना शिवीगाळ, Video व्हायरल

Tilak-Verma-Using-Bad-Words
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा २३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रंगला. मुंबईच्या प्रयत्नांनतरही पंजाबने १२ धावांनी हा सामना जिंकला. मुंबईचा हा हंगामातील सलग पाचवा पराभव होता. या सामन्यात मुंबईच्या फॉर्मात असलेल्या तिलक वर्मा याने पुन्हा एकदा चांगला खेळ दाखवला. परंतु सूर्यकुमार यादवच्या चुकीमुळे तो धावबाद झाला. आपण दुर्देवीरित्या बाद झाल्यामुळे त्याला राग अनावर झाला आणि पव्हेलियनमध्ये परतताना शिवीगाळ करताना दिसला. 

हा प्रसंग मुंबईच्या १३व्या षटकादरम्यान (MI vs PBKS) घडला. पंजाबकडून अर्शदीप सिंग हे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या या षटकातील पाचव्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) स्क्वेयर लेग आणि मिड विकेटच्या मधून फटका खेळला. परंतु तिथे ३० यार्डच्या सर्कलमध्ये पंजाबचा मयंक अगरवाल सावध उभा होता. परंतु सूर्यकुमारने फटका मारल्यानंतर नॉन स्ट्राईकर बाजूवर उभा असलेल्या तिलकने (Tilak Varma) कसलाही विचार न करता धावायला सुरुवात केली.

हेही वाचा- Video: जेव्हा मैदानावर तोंड पाडून बसला सूर्यकुमार, पोलार्डने असे काही करत जिंकली करोडो हृदये

परंतु सूर्यकुमार धावला नव्हता आणि त्याने तिलकला माघारी जाण्यास सांगितले. तोवर खूप उशीर झाला होता. तिलक खेळपट्टीच्या अर्ध्यापर्यंत पोहोचला आणि इकडे मयंकने चेंडू पकडून नॉन स्ट्राईकवर उभा असलेल्या अर्शदीपकडे थ्रो केला होता. अर्शदीपने कसलीही चूक न करता चेंडू यष्टीवर मारला आणि तिलक धावबाद (Tilak Varma Runout) झाला. परिणामी २० चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३६ धावा करून तो बाद झाला.

दुर्देवीरित्या धावबाद झाल्यामुळे तिलक हताश झाला. पव्हेलियनमध्ये परतताना तो खूप रागातही (Tilak Varma Using Bad Words) दिसला. यावेळी त्याच्या तोंडातून काही अपशब्दही निघाले, जे कॅमेरात कैद झाले आहेत.

https://twitter.com/addicric/status/1514300115250401282?s=20&t=QbphQfgsEv8ra6ppCXWAPA

कायरन पोलार्डही झाला धावबाद
महत्वाचे म्हणजे, या सामन्यात एकटा तिलक नव्हे तर कायरन पोलार्डही धावबाद झाला. ही घटना १७व्या षटकातील पहिल्या चेंडूवर घडली. पोलार्डने वैभव अरोराच्या चेंडूवर लाँग ऑनला फटका खेळला आणि तो एक धाव घेण्यासाठी पळाला. धाव पूर्ण केल्यानंतर पोलार्डला दिसले की, ओडियन स्मिथकडून चेंडू निसटला होता. त्यामुळे पोलार्डने त्याचा फायदा घेण्याचे ठरवले आणि अधिकची १ धाव घेण्याच्या तोही नादात धावबाद झाला. केवळ १० चेंडूवर त्याने त्याची विकेट गमावली.

महत्त्वाच्या बातम्या-

अफलातून! भावाने शॉटच असा मारला की, कर्णधार मयंक अगरवालही एकदम खुश; व्हिडिओ पाहाच

Video: जेव्हा मैदानावर तोंड पाडून बसला सूर्यकुमार, पोलार्डने असे काही करत जिंकली करोडो हृदये

रोहितवर बंदीची टांगती तलवार! मुंबई इंडियन्सची ‘ही’ एक चूक पडू शकते भलतीच महागात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---