मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात शनिवारी (०२ एप्रिल) आयपीएल २०२२चा नववा सामना झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत धाकधूक वाढवलेल्या या सामन्यात उभय संघांतील खेळाडूंनी लाजवाब खेळ दाखवला. प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थानने १९३ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात मुंबईकडूनही सलामीवीर इशान किशन आणि युवा तिलक वर्मा यांनीही वादळी खेळी केल्या. दरम्यान तिलकने राजस्थानविरुद्ध अर्धशतक ठोकत बरेच विक्रम शिरपेचात नोंदवले आहेत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या होत्या. राजस्थानच्या १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ४० धावांवरच मुंबईला २ मोठे झटके बसले. मात्र सलामीवीर इशानने एक बाजू धरून ठेवली होती. पुढे त्याच्या साथीला चौथ्या क्रमांकावर १९ वर्षीय तिलक आला.
तिलकने (Tilak Varma) पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेत संघाचा धावफलक वेगाने पुढे नेला. ३३ चेंडू खेळताना ५ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने ६१ धावा केल्या. त्यातही त्याने त्याचे आयपीएलमधील पहिलेच अर्धशतक (IPL Maiden Half Century) केवळ २८ चेंडूंमध्ये पूर्ण केले होते. या अर्धशतकासह तो आयपीएलमध्ये मुंबई संघाकडून धावांची पन्नाशी गाठणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. वयाच्या १९ व्या वर्षी १४५ दिवसांचा असताना तिलकने आयपीएलमधील त्याचे पहिले अर्धशतक केले आहे.
यापूर्वी इशानच्या नावे मुंबईकडून सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा (Youngest Player To Hit Half Century From MI) विक्रम होता. त्याने २०१८ मध्ये १९ वर्षे २७८ दिवसांचा असताना शतक ठोकले होते. मात्र आता तिलकने त्याचा हा विक्रम मोडला आहे.
https://twitter.com/IPL/status/1510243102753435648?s=20&t=JMeBLYH_mTI9YOAwkgfJ2w
यापूर्वी तिलकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण करताना १४६.६७ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. त्याने १५ चेंडू खेळताना ३ खणखणीत चौकारांच्या मदतीने २२ धावा फटकावल्या होत्या.
तिलक वर्माचे जबरदस्त सेलिब्रेशन
दरम्यान तिलकने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर विशेष पद्धतीने जल्लोषही साजरा केला. त्याने मुंबईच्या जर्सीवरील संघाच्या लोगोचे चुंबन घेत अर्धशतकाचा जल्लोष साजरा केला आहे. याखेरीज त्याच्या एका षटकाराने सीमारेषेबाहेर उभा राहून मैदानातील दृश्य कॅमेरात टिपत होता. यादरम्यान तिलकच्या एका षटकाराचा चेंडू त्याच्या कानाजवळून गेला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
DC vs GT | नाणेफेकीचा कौल रिषभच्या खात्यात, एका बदलासह असे आहेत दिल्ली आणि गुजरातचे संघ
काटा किर्रर्र..! बटलरचे मुंबईविरुद्ध अविस्मरणीय शतक, पण बुमराहने दिली तितकीच वेदनादायी जखम
सेफ हँड्स! पडीक्कलचा झेल रोहितसाठी ठरला विक्रमी, पूर्ण केले ट्वेंटी ट्वेंटीमधील ‘दीडशतक’






