जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ २७ एप्रिलपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. तत्पूर्वी, संघातील नवे खेळाडू संघाशी जोडण्यास सुरुवात झाली आहे. मेगा लिलावात कोट्यवधी रुपयांना खरेदी केलेला सिंगापूरचा अष्टपैलू खेळाडू टीम डेव्हिड (Tim David) हा नुकताच मुंबईत पोहोचला. त्याचे स्वागत करण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून एक खास पोस्ट करण्यात आली.
मुंबईने केले डेव्हिडचे स्वागत
आगामी आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने सिंगापूरचा अष्टपैलू टीम डेव्हिड याला ८ कोटी २५ लाख रुपयांची तगडी बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांना मागे टाकत त्यांनी ही बोली जिंकली. डेव्हिड यापूर्वी गतवर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी केवळ एक सामना खेळला होता. मात्र, जगभरातील इतर टी२० लीगमध्ये तो सातत्याने शानदार कामगिरी करत आला आहे. तडाखेबंद फटकेबाजी करण्यासाठी तो ओळखला जातो.
मुंबई इंडियन्सकडून डेव्हिड मुंबईत दाखल होतानाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. त्यांनी याला मजेशीर कॅप्शन देत लिहिले,
‘आपल्या तोडफोड मंडळाचा सदस्य टीम डेव्हिडचे घरी स्वागत’
🇸🇬 ✈️ ➡️ 🇮🇳 🏚️
Our newest member of the तोडफोड मंडळ, Tim David is home! 💥💙#OneFamily #MumbaiIndians @timdavid8 MI TV pic.twitter.com/Fo9DygMFgM
— Mumbai Indians (@mipaltan) March 10, 2022
मुंबई इंडियन्स लवकरच आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी आपले सराव शिबिर सुरू करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर या शिबिराचे आयोजन केले जाऊ शकते. कारण, संघाचा कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार जसप्रीत बुमराह हे राष्ट्रीय संघाचा भाग आहेत.
मुंबई इंडियन्स संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बासिल थंपी, एम अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टिळक वर्मा, संजय यादव, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन ऍलन
महत्वाच्या बातम्या-
Video : पाकिस्तानात चालता चालता स्विमिंग पूलमध्ये कोसळला ऑस्ट्रेलियन खेळाडू (mahasports.in)
Video : पाकिस्तानात चालता चालता स्विमिंग पूलमध्ये कोसळला ऑस्ट्रेलियन खेळाडू (mahasports.in)