---Advertisement---

पंड्याची उणीव भरून काढण्यासाठी मुंबईने खेळला ‘या’ खेळाडूवर ८ कोटीचा दाव

On: रविवार, फेब्रुवारी 13, 2022 5:16 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग चा इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात विदेशी खेळाडूंवर चांगला पैसा ओतला. १२ व‌ १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या मेगा लिलावात त्यांनी सिंगापूरचा अष्टपैलू व आक्रमक फलंदाज टीम डेव्हिडवर ८ कोटी २५ लाख रुपयांचे मोठी बोली लावत आपल्या संघात स्थान दिले.

मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी डेव्हिडने आयपीएल पदार्पण केले होते.‌ त्याला मागील हंगामात केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली. मात्र, यावर्षी अनेक संघ त्याच्यावर बोली लावताना दिसले. लखनऊ सुपरजायंट्स व राजस्थान रॉयल्स या संघांनी त्याच्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. तीन कोटीनंतर सुपरजायंट्स संघाने माघार घेतली. तर, ६ कोटीनंतर राजस्थान संघ बाहेर गेला. मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्सने अखेरपर्यंत त्याच्यावर बोली लावली. मात्र, जास्त पैसे शिल्लक असलेल्या मुंबईने त्याला अखेरीस आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---