भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे झालेला तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनसाठी फारसा चांगला ठरला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संपूर्णपणे पकडीत असलेला सामना भारताने अनिर्णीत सोडवला. या सामन्यात टीम पेनने सोडलेले झेल ऑस्ट्रेलियन संघासाठी तोट्याचे ठरले. पेनने सामन्यादरम्यानच अंपायर सोबत वाद देखील घातला होता. त्यामुळे त्याला आयसीसीने दंडही ठोठावला आहे. यानंतर सामन्याच्या पाचव्या दिवशी त्याने भारताचा फिरकीपटू आर अश्विन फलंदाजी करत असताना मोठ्या प्रमाणात स्लेजिंग केली होती. या सर्व बाबींनंतर पेनने जाहीर माफी मागितली आहे.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पेन म्हणाला, “मी सामना संपल्यानंतर लगेच अश्विन सोबत बातचीत केली. मी त्याला म्हणालो की शेवटी सामना संपल्यानंतर मीच मूर्ख वाटतोय. मी सुरुवातीला बोलल राहिलो व त्यानंतर कॅच सोडले.”
सामन्याबद्दल बोलताना पेन म्हणाला, “मी योग्य रित्या कर्णधारपद भूषवल नाही. मी दबावाला स्वतःवर वरचढ होवू दिलं. दबावामुळे माझ्या मूडवर व खेळावर देखील परिणाम झाला. मी कालच सर्व खेळाडूंना म्हणालो की एक कर्णधार म्हणून मी फार खराब कामगिरी केली. मी एक माणूस असून, कालच्या चुकीसाठी माफी मागतो.”
अश्विनला स्लेजिंक केल्याने पेन झाला ट्रोल –
पेनने सिडनी कसोटी दरम्यान अश्विनला ट्रोल करताना म्हटले होते की ‘गॅबा (ब्रिस्बेन) येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीत तुला पाहण्याची उत्सुकता आहे.’ अर्थात पेनला म्हणायचे असावे की चौथ्या कसोटीत आम्ही तुमच्यावर वर्चस्व ठेवू. पण अश्विननेही पेनचे ऐकून न घेता त्याला प्रतिउत्तर दिले. अश्विन म्हणाला, ‘जसे आम्हाला तुला भारतात पाहण्याची इच्छा आहे, कदाचीत ती तुझी कारकिर्दीतील शेवटची मालिका असेल.’
यानंतरही पेन शांत बसला नाही. त्याने अश्विनला बोलणे सुरुच ठेवले होते. त्यानंतर पेनच्या हातून अश्विनचा झेलही सुटला होता. त्यामुळे सामन्यानंतर पेन मोठ्याप्रमाणात ट्रोल झाला होता.
चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनला –
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे द गॅबा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याता १५ जानेवारीपासून सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे, या दुखापती का काय..! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक-दोन नव्हे तब्बल दहा भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त
कसोटी क्रमवारी: सिडनी कसोटीतील झुंजार शतकाचा स्मिथला फायदा, विराटला पछाडत घेतली ‘या’ स्थानी उडी
सिडनी येथील कामगिरीने दादा खुश! म्हणाले ‘आता तुम्हाला समजले असेल की….’