भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर -गावसकर कसोटी मालिकेमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव करत संपूर्ण क्रिकेट विश्वात भारतीय क्रिकेटची प्रतिमा उंचावली आहे. ॲडीलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर सर्व स्तरातून भारतीय संघावर टीका होत होती. मालिकेत भारतीय संघाचे पुनरागमन जवळजवळ अशक्य असल्याचे मानले जात होते. मात्र प्रमुख खेळाडूंना झालेली दुखापत व विराट कोहलीची पालकत्व रजादेखील अजिंक्यसेनेला रोखू शकली नाही. भारताच्या या विजयाबद्दल ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने देखील भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पेन म्हणाला,” आम्ही गाबा येथे सिरीज जिंकण्यासाठी आलो होतो, मात्र भारतीय संघाने आपल्या शानदार कामगिरीने आमचा पराभाव केला. भारतीय संघ ही मालिका जिंकण्याचा पूर्ण हकदार आहे.”
पेन पुढे म्हणाला, “आम्हाला पुन्हा सर्व परिस्थिती बघून सुधारणा करणे गरजेचे असेल. एक संघ म्हणून आम्ही पुन्हा एकजूट होणे गरजेचे आहे. खरे सांगायचे तर असे अनेक क्षेत्र आहे ज्यात आम्हाला सुधारणा करावी लागेल . आम्ही त्यांच्यासमोर 300 पेक्षा अधिक धावांचे लक्ष ठेवणार होतो. मला वाटल होत की शेवटच्या दिवशी भारतीय संघ ऑलआऊट होईल, मात्र त्यांच्या फलंदाजांनी आपल्या शरिरावर चेंडू घेतले पण विकेट सोडली नाही. या अविश्वसनीय कामगिरीमुळेच भारतीय संघ विजयाचा हकदार आहे.”
Tim Paine reflects on being outplayed by a disciplined and tough side.
Congratulations, India! 👏#AUSvIND pic.twitter.com/vSbYVvZIM2
— ICC (@ICC) January 19, 2021
सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 328 धावांचा पाठलाग करताना चेतेश्वर पुजाराच्या 56, शुभमन गिलच्या शानदार 91 व रिषभ पंतच्या आक्रमक 89 धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाने 3 गडी राखून ऐतिहासिकरित्या सामना जिंकला. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे. दुसरीकडे भारताविरुद्धची मालिका गमावल्याने पेनवर प्रचंड दबाव निर्माण झाला असून, त्याचे कर्णधारपद देखील धोक्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाच्या चर्चेपुढे ‘हा’ मालिकावीर दुर्लक्षितच!
ऐतिहासिक विजय मिळवून देणारे भारतीय संघातील हिरे! जाणून घ्या या ५ खेळाडूंची संघर्षगाथा