---Advertisement---

न्यूझीलंडच्या फलंदाजाचा टी२० ब्लास्टमध्ये राडा! जबराट सिक्स मारताच चेंडूने गाठले बर्गरचे दुकान, VIDEO VIRAL

On: रविवार, जून 5, 2022 6:37 PM
Tim-Seifert
---Advertisement---

आपण अनेकदा क्रिकेटमध्ये लांबच्या लांब षटकार मारलेले पाहिले आहेत. लांब षटकार मारल्याचे विक्रम बनल्याचेही आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात. मात्र, फलंदाजाने षटकार मारल्यानंतर चेंडू थेट ग्राऊंडच्या बाजूला असलेल्या दुकानात गेल्याचे कधी पाहिलं आहे? नसेल पाहिले, तर असेच दृष्य दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. ही घटना सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी२० ब्लास्ट स्पर्धेत घडली आहे.

ससेक्स आणि हेम्पशायर या दोन संघात सुरू असलेल्या टी२० सामन्यांत हे दृक्ष्य पाहायला मिळाले. या सामन्यात ससेक्स संघाकडून फलंदाजी करत असताना न्यूझीलंड संघाचा फलंदाज टीम सिफर्ट याने ५६ चेंडूत शतक झळकावले. या खेळीवेळी सिफर्टने ग्राऊंडवर उपस्थित प्रत्येक दर्शकाला चकित करून सोडले.

न्यूझीलंडच्या सिफर्टने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ९ षटकार लगावले. या खेळीदरम्यान सिफर्टने शेवटच्या षटकात सलग ३ षटकारही ठोकले. मात्र, ससेक्सचा संघ पराभूत झालेल्या सामन्यातही सिफर्टची फलंदाजी चर्चेचा विषय ठरली होती. शेवटच्या ३ षटकांमध्ये सिफर्टची फलंदाजी पाहण्यासारखी होती. सिफर्टचे टी२० क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. किवी खेळाडूने १७८.५७च्या स्ट्राईक रेटने धावा करून गोलंदाजांची चांगलीच कोंडी केली. पराभवानंतरही सिफर्टची फलंदाजी पाहून त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला.

आपल्या या खेळीत सिफर्टने पाच षटकार लगावले, त्यापैकी एक षटकार इतका घातक होता की, चेंडू हवेत गेल्यानंतर थेट बाजूला असलेल्या बर्गरच्या दुकानात जाऊन पोहोचला. या षटकारानंतर अनेकांनी सोशल मीडियावर सिफर्टचे कौतुक करत आहेत. त्याच्या या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

हॅम्पशायरने २० षटकांत ६ गडी गमावून १९९ धावा केल्या होत्या, त्यानंतर ससेक्सचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून १७७ धावाच करू शकला. त्यामुळे ससेक्सला २२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

“जर गांगुलीने माझी साथ दिली नसती, तर त्याला कर्णधारपद सोडावे लागले असते”

मुलगा झोरावरच्या आठवणीने व्याकूळ झालेला ‘गब्बर’, भेटल्यानंतर कडकडून मारली मिठी, चाहतेही झाले व्यक्त

देर आये दुरुस्त आये! चौदा वर्षांनंतर भज्जीला चुकीची जाणीव, श्रीसंतसोबतच्या ‘थप्पड कांड’वर दिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---