इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चे बिगूल वाजलं आहे. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या या १४ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामातून कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून न्यूझीलंडचा टीम सिफर्ट हा खेळाडू पदार्पण करु शकतो.
यष्टीरक्षक फलंदाज असलेला टीम सिफर्ट हा २६ मार्चलाच भारतात दाखल झाला असून तो कोलकाता संघाकडून सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो. त्याने आत्तापर्यंत न्यूझीलंडकडून ३ वनडे आणि ३५ टी२० सामने खेळले आहेत. सिफर्ट हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने २०१७ साली सुपर स्मॅश स्पर्धेत ४० चेंडूत शतक ठोकले होते. त्यामुळे न्यूझीलंडच्या देशांतर्गत स्पर्धेत जलद शतक करणारा तो खेळाडू आहे.
हॉकी खेळण्याची कला अवगत
सिफर्टने क्रिकेट या खेळात जरी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजवले असले, तरी तो हॉकी हा खेळ देखील उत्तम खेळू शकतो. त्याने १८ वर्षांखालील न्यूझीलंड हॉकी संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. याबद्दल नुकत्याच कोलकाता नाईट रायडर्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माहिती त्याने दिली आहे.
तो या व्हिडिओमध्ये सांगत आहे की ‘मी हॉकी आणि क्रिकेट खेळाडू आहे. मी क्रिकेट उन्हाळ्यात खेळायचो आणि हॉकी थंडीत खेळायचो. मी माझ्या हॉकी कारकिर्दीत बराच काळ स्ट्रायकर होतो. मला स्ट्रायकरबद्दल ज्या गोष्टी आवडत्या त्या म्हणजे ‘डी’ मध्ये डायव्हिंग करता येते. फ्लिक्स करण्याचा प्रयत्न करणे आणि गोल करणे. आपल्या संघासाठी डिफेंडरला आणि कॉर्नरला जाऊन गोल करणे. अशा प्रकारे मला हॉकी खेळायला आवडते.’
तसेच तो पुढे म्हणाला, ‘मला वाटते त्यामुळे क्रिकेटमध्ये स्विट हिट, पॅडल्स आणि स्केअर ऑफ द विकेटला काही शॉट्स खेळायला मदत होते. कारण ते खरंच हॉकीमधील शॉट्स आहेत. तुम्ही रॉस टेलर, बीजे वॉटलिंग या खेळाडूंना पाहिले असेल, ते सुद्धा हॉकीपटू आहेत. ते सुद्धा स्केअर ऑफ द विकेटला चांगले खेळतात, मला वाटतं हॉकी यासाठी मदतशीर ठरतो.’
याबरोबर सिफर्टने हे देखील सांगितले की त्याने क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्याचे कधी ठरवले. तो म्हणाला, ‘माझी न्यूझीलंडच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली. ही माझ्यासाठी चांगली संधी होती. त्या विश्वचषकानंतर थंडीत मला इंग्लंडमध्ये यॉर्कशायर हडर्सफिल्ड लीगमध्ये क्बल क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. ती पहिली वेळ होती की मी पूर्ण वर्षभर क्रिकेट खेळलो होतो. त्यामुळे मला क्रिकेटमध्येच पुढे जायचे आहे, हे समजायला तिथून सुरुवात झाली.’
याशिवाय सिफर्टने लहानपणी शिक्षक असणाऱ्या त्याच्या आई-वडीलांनी त्याला आणि त्याच्या बहिणीला जगातील अनेक ठिकाणांची भेट करुन दिली असल्याबद्दल भाग्यशाली असल्याचे म्हटले आहे.
Not long before Tim is free to join the rest of the squad 💪
Here he is talking about how he got into the game, how being a former hockey player has helped his explosive game, and a lot more! 🗣️#QuarantinedKnights #KKR #HaiTaiyaarhttps://t.co/en1sIexRwi
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 31, 2021
टीम सिफर्टने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे आता त्याला यावर्षी पदार्पण करण्याची संधी मिळणार का हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वोत्तम इकॉनॉमी रेट असलेले अव्वल ५ गोलंदाज, केवळ एक आहे भारतीय
‘ही तुमची शेवटची वेळ,’ लाईव्ह सामन्यात कोहलीने दिली होती इंग्लिश खेळाडूला धमकी; आता झाला खुलासा
अशा २ व्यक्ती, ज्यांनी खेळाडू व प्रशिक्षक म्हणून जिंकला आहे क्रिकेट विश्वचषक