वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या बासिन रिझर्व स्टेडियमवर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात आज(23 फेब्रुवारी) तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 144 धावा केल्या आहेत. भारत अजून 39 धावांची पिछाडीवर आहे.
या डावात तिसऱ्या दिवसाखेर भारताकडून मयंक अगरवालने सर्वाधिक 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र अर्धशतक केल्यानंतर तो लगेचच टीम साऊथीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यामुळे साऊथीच्या नावावर एक विश्वविक्रम झाला आहे. साऊथीने न्यूझीलंडमध्ये खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
न्यूझीलंडमध्ये खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. हा पराक्रम करतानाच त्याने न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत दिग्गज गोलंदाज डॅनियल विट्टोरीच्या 299 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे. विट्टोरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 193 सामन्यांमध्ये 299 विकेट्स घेतलेले आहेत.
साऊथीने वेलिंग्टनला भारताविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात याआधी पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत या सामन्यात त्याच्या एकूण 5 विकेट्स झाल्या आहेत. तसेच साऊथीच्या आता न्यूझीलंडमध्ये खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 153 सामन्यात 300 विकेट्स झाल्या आहेत.
सध्या सुरु असलेल्या भारत – न्यूझीलंड कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 165 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद 348 धावा करत 183 धावांची आघाडी घेतली होती.
#न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज –
300 – टीम साऊथी (153 सामने)
299 – डॅनिएल विट्टोरी (193 सामने)
277 – ट्रेंट बोल्ट (102 सामने)
https://twitter.com/Maha_Sports/status/1231488114499227649
ऐकावं ते नवलच! चक्क गाय मैदानात शिरल्याने रणजी सामन्यात आला व्यत्यय https://t.co/4WRY0vwsya#म #मराठी #cricket #ranjitrophy
— Maha Sports (@Maha_Sports) February 23, 2020