आजपासून पुणे महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

पुणे। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे महानगरपालिका यांच्या सौजन्याने पुणे महापौर कबड्डी चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. आज स्पर्धेचे उद्घाटन प्रो कबड्डी खेळाडु सिद्धार्थ देसाईच्या हस्ते होणार आहे.

Related Posts

जीत मैदान, सह्याद्री हॉस्पिटलच्या समोर, कोथरूड येथे दिनांक २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२० दरम्यान कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. यास्पर्धेत प्रो कबड्डीचे स्टार खेळाडु नितीन मदने, रिशांक देवडीगा, विकास काळे, विराज लांडगे, अक्षय जाधव, सुनील दुबिले, दादा आव्हाड, सिद्धार्थ देसाई, निलेश साळुंखे, निलेश शिंदे आदी दिग्गज खेळाडु खेळणार आहेत.

चार दिवस होणाऱ्या यास्पर्धेत पुरुषाचे ३९ तर महिलांचे २१ असे एकूण ६० संघ सहभागी होणार आहेत. यावर्षी महानगरपालिकेकडून बक्षिसाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. विजेत्या संघास १,५०,००० रुपये व चषक, उपविजेत्या संघास १,००,००० रुपये व चषक तर उपांत्य उपविजयी संघास प्रत्येकी ७५,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक बक्षिसे ही देण्यात येणार आहेत.

You might also like