पूर्ण दोन वर्षांच्या कालावधीनंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला गेला. हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झाला. न्यूझीलंड संघाने आपले वर्चस्व गाजवत भारतीय संघाचा पराभव केला आणि जेतेपद आपल्या नावावर केले. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. यानंतर आता न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने सांगितले की, “जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतासारख्या बलाढ्य संघाला हरवून जेतेपद पटकावण्याचा आनंद संपायला काही आठवडे लागतील. या संघाचा भाग असणे अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही दोन वर्षांपासून यासाठी कठोर परिश्रम घेत होतो. केवळ १५ खेळाडूच नाही तर इतरही जे संघात मागील पाच ते सहा वर्षांपासून होते. त्या प्रत्येकाच्या योगदानाने आम्ही येथे पोहोचलो आहोत.”
पाऊस आणि अंधुक प्रकाशाच्या व्यत्ययामुळे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचा निकाल राखीव दिवसावर गेला होता. या दिवशी भारताने न्यूझीलंडला विजयासाठी फक्त १३९ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इतका वेळ लागेल असा विचारही साऊदीने केला नसल्याचे त्याने सांगितले आहे.
साऊदी म्हणाला की, “आम्हाला माहित होते की शेवटचा दिवस कठीण जाईल. तीन निकाल शक्य होते आणि पहिला तास महत्त्वपूर्ण होता. त्यावेळी आम्ही दोन बळी घेऊन भारतीय संघावर दबाव निर्माण केला होता. पण मी कधीच विचार केला नव्हता की, आम्हाला १३९ धावा करण्यास इतका वेळ लागेल. ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येकजण खूप घाबरला होता. पण, खेळपट्टीवर दोन अनुभवी फलंदाज होते, जे सात ते आठ वर्षांपासून खेळत आहेत. त्यामुळे आमच्या आशा पल्लवित होत्या.”
महत्वाच्या बातम्या
काय शॉट खेळलाय! गोलंदाजाने चेंडू टाकताच फलंदाजाने फिरून मारला रिव्हर्स स्वीप षटकार
संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवलं, तरीही फक्त ५ वनडे सामन्यांवर मानाव लागलं समाधान
एक पराभव अन् कोहलीवर टीकांचा वर्षाव, पण त्याची ‘ही’ कामगिरी भल्याभल्याची बोलती करेल बंद