---Advertisement---

VIDEO: शेवटच्या सामन्यात अशा प्रकारे बाद झाला फिंच! अजूनही सामन्यात करू शकतो विशेष कामगिरी

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 2:53 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय कर्णधार आणि सलामीवीर ऍरॉन फिंच आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विशेष काही करू शकला नाही. केर्न्समध्ये खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये फिंच 5 धावा काढून बाद झाला. त्याला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने बोल्ड केले. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

फिंचला शेवटचा एकदिवसीय सामना संस्मरणीय बनवता आला नसला तरी कांगारू संघाला अजूनही आपल्या कर्णधाराला निरोप देण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली आहे आणि फिंचला क्लीन स्वीप करून संस्मरणीय निरोप द्यायचा आहे. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, ऍरॉन फिंच टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद कायम राखणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात संघ सहभागी होणार आहे. मात्र, टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेतच त्याने विश्वचषकानंतर निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पंत की कार्तिक’ टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळावे?
RSWSमध्ये रविवारी क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी! एकाच दिवशी ‘जयसूर्या-लारा’सह अनेक दिग्गज खेळणार सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---