इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात असणारा टायमल मिल्स याला जास्त सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्याने काहीच सामने खेळत आपली छाप सोडण्याचा प्रयत्न केला आहे. आयपीएल संपल्यानंतर टायमल आता टी२० ब्लास्ट या मालिकेत खेळत आहे. त्यावेळी त्याने एक अविश्वसनिय झेल घेत सर्वांनाच अवाक करून सोडले आहे.
बुधवारी (दि. १ जून) रोजी टी२० ब्लास्ट स्पर्धेत ससेक्स आणि समरसेट यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना ससेक्सने २१७ धावांचे लक्ष्य दिले होते. यादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज फिलिपने संघासाठी ४३ चेंडूत ७० धावा केल्या. त्याच्या खेळीत ५ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. प्रत्युत्तरात समरसेटच्या खेळाडूंना केवळ १६९ धावा करता आल्या. यादरम्यान मिल्सने ससेक्ससाठी जबरदस्त गोलंदाजी करताना ४ बळी घेतले. शिवाय एक अद्वितीय झेल घेत आपल्या संघाचा विजय निश्चित केला.
समरसेटचा फलंदाज रिले रॉसोने रोलिन्सचा चेंडू पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला, पण काही अंतरावर उभ्या असलेल्या टायमल मिल्सने चेंडूच्या दिशेने हवेत उडी मारली. आणि अविश्वसनीय असा झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ शेअर करत मुंबई इंडियन्सकडून टायमल्सचे कौतुक करण्यात आले आहे.
Tymal came flying in ✈️😯
Commander Pamment would be proud 💪✅#OneFamily @tmills15 pic.twitter.com/yOxGwy8qaB
— Mumbai Indians (@mipaltan) June 2, 2022
दरम्यान, टायमलने यंदाच्या हंगामात मुंबईसाठी पाच सामने खेळले आहेत. ज्यात त्याने त्याने ६ बळी आपल्या नावे केल्या. त्याला मुंबईसाठीजास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नसली तरी त्याने कमी सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पुढील वर्षी त्याला आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजस्थानसाठी बटलरसह ‘या’ तीन खेळाडूंनी गाजवलीये यंदाची आयपीएल, चोपल्यात सर्वात जास्त धावा
‘या’ २ भारतीय खेळाडूंनी यूएसएला मिळवून दिला विजय, वनडेतील दमदार संघाला चारली धूळ