---Advertisement---

संपुर्ण वेळापत्रक- अशी आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका

On: शुक्रवार, मार्च 1, 2019 6:45 PM
---Advertisement---

हैद्राबाद । टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी२० सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभूत झाली. त्यानंतर उद्यापासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. पहिला सामना उद्या दुपारी १ वाजून ३० मिनीटांनी हैद्राबाद येथे सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा १५ फेब्रुवारी रोजीच करण्यात आली आहे.

या मालिकेत कर्णधार विराट कोहलीसह उपकर्णधार रोहित शर्माची सर्वच सामन्यांत निवड झाली आहे. पहिल्या दोन सामन्यांत संधी देण्यात आलेल्या सिद्धार्थ कौलला शेवटच्या तीन सामन्यांत मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या ऐवजी भुवनेश्वर कुमार संघात पुनरागमन करेल. बाकी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

उद्यापासून वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना हैद्राबादला होणार आहे. त्यानंतर नागपूर, रांची, मोहाली आणि दिल्ली येथे वनडे सामने होतील.

सर्व वनडे सामने दुपारी 1.30 वाजता सुरु होतील. ही मालिका दोन्ही संघासाठी मेमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

या मालिकेतील केवळ एकच सामना महाराष्ट्रात होणार आहे. हा मालिकेतील दुसरा सामना असून तो ५ मार्च रोजी नागपुर येथे होणार आहे.

वनडे मालिका –

पहिला वनडे सामना – 2 मार्च – हैद्राबाद – वेळ: दुपारी 1.30 वाजता

दुसरा वनडे सामना – 5 मार्च – नागपूर – वेळ: दुपारी 1.30 वाजता

तिसरा वनडे सामना – 8 मार्च – रांची – वेळ: दुपारी 1.30 वाजता

चौथा वनडे सामना – 10 मार्च – मोहाली – वेळ: दुपारी 1.30 वाजता

पाचवा वनडे सामना – 13 मार्च – दिल्ली – वेळ: दुपारी 1.30 वाजता

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीला द वाॅल राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याची संधी

काय सांगता ! हिटमॅन रोहित शर्माचा २६४ धावांचा विक्रम मोडला

उद्यापासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी अशी आहे १५ जणांची टीम इंडिया

पहिल्या वनडेत धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, टीम इंडियाला मोठा धक्का

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment