भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यानच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारी (12 जुलै ) सुरुवात होत आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ मैदानावर उतरेल. हे पहिलीच मालिका जिंकून नव्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सायकलमध्ये विजयी प्रारंभ करण्याचा भारतीय संघाचा मनसुबा असेल. भारतीय चाहत्यांना मात्र ही मालिका बघण्यासाठी आपल्या वेळापत्रकात मोठा बदल करावा लागणार आहे. कारण, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वेळेत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने भारतीय चाहत्यांना हे सामने मध्यरात्रीपर्यंत जागून पहावे लागतील.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना डॉमिनिका येथे होईल. वेस्ट इंडीजमधील स्थानिक प्रमाण वेळेनुसार हा सामना सकाळी नऊ वाजता सुरू होईल. मात्र, भारतात त्यावेळी 7.30 वेळ झालेली असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहिले सत्र 7.30 ते 9.30 या कालावधीत खेळले जाईल. त्यानंतर 40 मिनिटांचा लंच ब्रेक असेल. दुसऱ्या सत्राला भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी सुरुवात होईल. हे सत्र मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत चालेल. त्यानंतर 20 मिनिटे चहापानाचा ब्रेक झाल्यानंतर तिसऱ्या सत्राला सुरुवात होईल. याचाच अर्थ भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 2 वाजून 30 मिनिटांनी पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त होईल. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना ही संपूर्ण मालिका बघण्यासाठी आपल्या झोपेचे नियोजन करणे गरजेचे असेल.
भारतीय संघ या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरेल. तर अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार आहे. या मालिकेसाठी भारताच्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली गेली असून, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड व मुकेश कुमार हे प्रथमच कसोटी संघात दिसतील. तसेच, जवळपास तीन वर्षाच्या कालावधीनंतर वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याला या मालिकेसाठी संधी दिली गेली आहे.
(Timing For India West Indies Test Series)
महत्वाच्या बातम्या-
नाईट रायडर्सचे नेतृत्व नरीनच्या हाती! अमेरिकेत उडणार टी20 क्रिकेटचा धुरळा, ‘हे’ दिग्गज ही साथीला
पाकिस्तानला नडणार अतिशहाणपणा! ‘या’ संघाला वर्ल्डकपमध्ये प्रवेश देण्याची आयसीसीची तयारी