मुंबई । भारताचे माजी वेगवान गोलंदाज टीनू योहानन यांची केरळ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केरळ क्रिकेट संघटनेने सोमवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेतला.योहाननपूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेव्ह व्हाटमोर केरळ संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.
41 वर्षीय योहान यांनी भारताकडून 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापूर्वी त्यांनी आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. योहाना 2001 साली मोहाली येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कसोटीमध्ये पदार्पण केले होते. यासोबत केरळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पहिले खेळाडू बनले.
योहानन यांनी 2001 ते 2002 दरम्यान भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले आहेत. यामध्ये त्यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात प्रत्येकी पाच बळी घेतले आहे. त्यांनी त्यांचा शेवटचा सामना डिसेंबर 2002 साली न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे कसोटी सामना खेळला होता. तो त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना होता.
मुलगा क्रिकेटपटू तर वडील ‘ऍथलिट ‘
प्रथम श्रेणीच्या 59 सामन्यात 524 धावा काढल्या. यासोबत 145 बळीदेखील घेतले. 2009 त्यांचा शेवटचा प्रथम श्रेणीचा सामना खेळला होता. योहानाचे वडील टीसी योहाना हे लाँग जंपर मध्ये एशियन्स गेममध्ये रेकॉर्ड होल्डर आहेत. 1976 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत टीसी योहाना यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.






