सध्या तमिळनाडू प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा खेळली जात आहे. 12 जूनपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रंजक क्षण पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाच्या स्टार खेळाडूंपासून ते स्थानिक खेळाडूंचा समावेश आहे. रविवारी (दि. 18 जून) डिंडीगुल ड्रॅगन्स विरुद्ध मदुराई पँथर्स संघात स्पर्धेचा 8वा सामना खेळला गेला. या सामन्यात अश्विन याने अफलातून झेल पकडला, जो पाहून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या. सोशल मीडियावर त्याच्या झेलाचे कौतुक होत आहे.
अश्विन हा मागच्या दिशेने धावत गेला आणि त्याने जबरदस्त झेल पकडला. ज्या क्रिकेटप्रेमीने हा झेल पाहिला, तोदेखील हैराण झाला. हा अश्विन भारतीय संघाटा स्टार फिरकीपटू नाही, तर एम अश्विन होता. त्याचे पूर्ण नाव मुरुगन अश्विन (Murugan Ashwin) असे आहे. अश्विन आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात अश्विन राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून खेळला होता. आता तमिळनाडू प्रीमिअर लीग 2023 (Tamilnadu Premier League 2023) स्पर्धेत मदुराई पँथर्स संघाचा भाग आहे. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) डिंडीगुल ड्रॅगन्स संघाचे नेतृत्व करत आहे.
एम अश्विनने असा पकडला झेल
मुरुगन अश्विनच्या झेलाविषयी बोलायचं झालं, तर त्याने डिंडीगुल ड्रॅगन्स संघ फलंदाजी करत होता. यादरम्यान चौथे षटक गुरजपनीत सिंग टाकत होता. त्याने गुड लेंथ चेंडू टाकला, ज्यावर फलंदाज एस अरुण याने मैदानाबाहेर फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू हवेत गेला आणि एम अश्विनने शानदार झेल पकडला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
One of the finest catches ever!
Flying Murugan Ashwin. pic.twitter.com/HiaSxRLfQ8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 19, 2023
सामन्याची स्थिती
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर डिंडीगुल ड्रॅगन्स विरुद्ध मदुराई पँथर्स (Dindigul Dragons vs Madurai Panthers) संघात हा सामना खेळला गेला. या सामन्यात मदुराई संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 विकेट्स गमावत 123 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना डिंडीगुल ड्रॅगन्स संघाने 14.1 षटकात 3 विकेट्स गमावत आव्हान पार करत सामना जिंकला. बाबा इंद्रजीत याने 48 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 78 धावांची शानदार खेळी साकारली. तसेच, ड्रॅगन्सकडून सुबोथ भाटी यानेही 4 षटकात 19 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. (tnpl 2023 amazing catch take by cricketer murugan ashwin in air watch video)
महत्वाच्या बातम्या-
बापरे! बाल्कनीत बसून सामना पाहत होती महिला, फलंदाजाने षटकार मारल्यानंतर पुढे काय घडलं पाहाच
मियाँदादने भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ! विधानाने 140 कोटी भारतीयांच्या तळपायाची आग जाईल मस्तकात