तमिळनाडू प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 27वा सामना मंगळवारी (दि. 4 जुलै) मदुराई पँथर्स विरुद्ध आयड्रीम तिरुप्पूर तमिझंस संघात पार पडला. या सामन्यात पँथर्सने 4 धावांच्या नजीकच्या फरकाने विजय मिळवला. या विजयासह मदुराई पँथर्स संघ टीएनपीएल 2023 स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचला आहे. आता प्ले-ऑफसाठी चार संघही निश्चित झाले आहेत. त्यामध्ये लायका कोवई किंग्स, डिंडीगुल ड्रॅगन्स, नेल्लई रॉयल किंग्स आणि मदुराई पँथर्स या संघांचा समावेश आहे. साखळी फेरीमध्ये आता फक्त एकच सामना शिल्लक राहिला आहे.
पँथर्सने मारली बाजी
या सामन्यात आयड्रीम तिरुप्पूर तमिझंस (IDream Tiruppur Tamizhans) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मदुराई पँथर्स (Madurai Panthers) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 160 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना तमिझंस संघ 6 विकेट्स गमावत 156 धावाच करू शकला. त्यामुळे हा सामना पँथर्स संघाने 4 धावांनी जिंकला.
Into the playoffs!????????#TNPL2023????#smpvsidtt#PoduSakkaPodu#MeesayaMurukkiSollu#PattayaKelappu#TNPLonstarsports#TNPLonfancode#NammaAatamAarambam????#NammaOoruNammaGethu???????? pic.twitter.com/wZhAsPru4X
— TNPL (@TNPremierLeague) July 4, 2023
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पँथर्स संघाने चांगली सुरुवात केली होती. यष्टीरक्षक फलंदाज लोकेश्वर आणि कर्णधार हरि निशांत यांच्यात पहिल्या विकेटसाठी 8.2 षटकात 68 धावांची भागीदारी झाली. लोकेश्वर याने 37 चेंडूत 44 धावा केल्या, तर निशांतने 27 चेंडूत 34 धावा केल्या. विष्णू आदित्य यानेही मधल्या फळीत फलंदाजी करताना 28 चेंडूत 37 धावांची खेळी साकारली. या तिघांव्यतिरिक्त एकही खेळाडू 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही.
यावेळी तमिझंसकडून गोलंदाजी करताना त्रिलोक नाग याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच, अजित राम, ए करुप्पूसामी आणि एस मनिगंदन यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
अखेरच्या षटकात 17 धावा करण्यात तमिझंस अपयशी
पँथर्सच्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विशाल वैद्य आणि तुषार रहेजा यांनी शानदार फलंदाजी केली. विशालने 21, तर तुषारने 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 51 धावांची खेळी साकारली. मधल्या फळीत विजय शंकर (Vijay Shankar) याने 28 धावांचे योगदान दिले. संघाला अखेरच्या षटकात विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती. यातील पहिल्या दोन चेंडूंवर 10 धावांची बरसातही झाली होती. मात्र, चार चेंडूत 7 धावा करण्यात तमिझंस संघ अपयशी ठरला. पी भुवनेश्वर 7 चेंडूत 18 धावा करून नाबाद राहिला.
यावेळी पँथर्सकडून गोलंदाजी करताना गुरजपनीत सिंग आणि अजय कृष्णा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, मुरुगन अश्विन आणि पी सर्वनन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (tnpl 2023 madurai panthers vs idream tiruppur tamizhans 27th read here)
महत्वाच्या बातम्या-
Big Breaking: माजी भारतीय खेळाडूचा भयानक अपघात, थोडक्यात वाचला जीव; मुलगाही होता सोबत
संघ विश्वचषकातून बाहेर पडताच कर्णधाराने दिला राजीनामा, क्रिकेटविश्वात खळबळ