कोरोना व्हायरसमुळे काही काळासाठी सर्व क्षेत्रे ठप्प पडली होती. या महामारीचा प्रभाव क्रीडाविश्वावरही झाला होता. क्रीडाविश्वातील अनेक स्पर्धा आणि मालिका रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाचा प्रभाव थोडा कमी झाल्यानंतर हळूहळू क्रिडाक्षेत्र पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे. त्यातही जून महिन्यात क्रिकेट सामान्यांचे जोरदार पुनरागमन झाले आहे. याच महिन्यातील शनिवारचा दिवस (१९ जून) क्रिकेट रसिकांसाठी जणू पर्वणीच ठरला आहे. शनिवार रोजी आंतराष्ट्रीय क्रिकेट आणि टी-२० लीग धरून क्रिकेट चाहत्यांना एकूण १० सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.
आंतराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, सर्वात मोठा सामना असेल तो म्हणजे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना. भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना आजपासून साउथम्पटन येथे रंगणार आहे. खरे तर आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. काल साउथम्प्टनमध्ये पाऊसाची रिमझिम चालू राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. या सामन्याची नाणेफेक अजून झाली नाही. अशी आशा असेल की, आज वातावरण ठीक असेल आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामनाचा पहिला चेंडू आज टाकला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरु होईल आणि २:३० ला सामन्याची नाणेफेक होईल.
दुसरीकडे ब्रिस्टलमध्ये भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर पावसाचा व्यत्यत आला. शनिवारी या सामन्याचा चौथ्या दिवस असून दुपारी ३:३० वाजता चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होईल.
सेंट लुईस कसोटीचा आज दुसरा दिवस
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा सामना वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात असेल. या दोघांमध्ये दुसरी कसोटी सेंट लुसियामध्ये खेळली जात आहे. दुसर्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल.
टी-२० स्पर्धांमध्ये होतील ७ सामने
अबू धाबी येथे खेळल्या जाणार्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये शनिवारी २ साखळी फेरे सामने खेळले जातील. साखळी फेरीतील हे शेवटचे दोन सामने आहेत आणि त्यानंतर प्लेऑफ सामन्यांना सुरुवात होईल. आज पीएसएल २०२१ मध्ये प्रथम सामना हा क्वेटा ग्लेडिएटर्स आणि कराची किंग्ज यांच्यात होईल. हा सामना सायंकाळी ६:३० वाजता सुरू होईल. दुसरा सामना इस्लामाबाद युनायटेड आणि मुलतान सुल्तान यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ११:३० वाजता सुरू होईल.
इंग्लंडमध्ये होत असलेल्या टी-२० ब्लास्ट लीगमध्ये शनिवारी एकच सामना होणार आहे. टॉन्टनमधील ग्लैमॉर्गनचा सामना समरसेटशी होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ११:३० वाजता सुरू होईल.
बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या ढाका प्रीमियर टी२० लीगमध्ये शनिवारी चार सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना हा सकाळी ८:३० चालू होणार आहे. हा सामना प्राइम डोलेश्वर स्पोर्टिंग क्लब विरुद्ध गाजी ग्रुप क्रिकेटर्स असा असेल. दुसरा सामना हा सकाळी ९:३० लीजेंड्स ऑफ रूपगंज विरुद्ध पार्टेक्स स्पोर्टिंग क्लब असणार आहे. त्यानंतर तिसरा सामना हा दुपारी १:३० वाजता प्राइम बैंक क्रिकेट क्लब विरुद्ध शेख जमाल ढामोंडी क्लबमध्ये होणार आहे. चौथा सामना हा सायंकाळी ६ वाजता अबहानी लिमिटेड विरुद्ध मोहमेडन स्पोर्टिंग क्लबमध्ये होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
युवा शेफाली वर्माने रचला इतिहास, ठरली ‘हा’ पराक्रम करणारी पहिली भारतीय खेळाडू
सचिन तेंडुलकरच्या मुलीच्या नावात आहे ‘मोठं’ रहस्य; जाणून घ्या साराच्या नावामागील न ऐकलेली कहाणी
भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूने शेअर केला बालपणीचा भन्नाट फोटो, पाहा तुम्हाला ओळखता येतो का