महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने “कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी” यांची १२ वी पुण्यतिथी निमित्त शुक्रवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता. राज्य संघटनेच्या शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथील कार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
बुवा साळवी यांनी आपली उभी हयात कबड्डीचा प्रसार-प्रचार करण्यात घालविली. असा या कबड्डीच्या वारकऱ्याला भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी कबड्डीप्रेमी, खेळाडू, संघटक, कार्यकर्ते व बुवांचे चहाते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे नम्र आव्हान राज्य कबड्डी संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.