आज त्या गोष्टीला ४२ वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी १९७५ साली महान टेनिसपटू जिमी कॉनर्स यांना आर्थर ऍशे यांनी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पराभूत करून विम्बल्डन जिंकणारा पहिला आणि एकमेव कृष्णवर्णीय खेळाडू बनण्याचा विक्रम केला होता.
चार सेटमध्ये झालेल्या या सामन्यात आर्थर ऍशे यांनी ६-१, ६-१, ५-७, ६-४ असे जिमी कॉनर्स यांना पराभूत केले होते. त्या स्पर्धेपूर्वी आर्थर ऍशे यांच्या नावावर केवळ दोन ग्रँडस्लॅम पदके होती. त्यांनी १९७० सालची ऑस्ट्रेलियन ओपन आणि १९६८ सालची अमेरिकन ओपन जिंकली होती. तर जिमी कॉनर्स यांनी त्या आधीच्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन यांची विजेतेपद मिळवली होती.
हा सामना त्यावेळी टेनिस प्रेमींसाठी एक मेजवानीच ठरला होता. अमेरिकेकडून डेव्हिस कपमध्ये खेळलेले आर्थर ऍशे हे एकमेव कृष्णवर्णीय खेळाडू होते.
आज या सामन्याला ४२ वर्ष पूर्ण होत आहे तरीही त्यावेळच्या टेनिसप्रेमींना हा दोन दिग्गजांमधील सामना अगदी काल झाल्यासारखा वाटतो.