सध्याच्या क्रिकेट वर्तुळात सर्वोत्तम फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाव घेतले जाते. विराटने आत्तापर्यंत अनेकदा शानदार खेळी केल्या आहेत. त्याच्या नावावर तब्बल ७० शतकांची नोंद आहे. त्याची विकेट घेणे सहसा गोलंदाजांना सोपे जात नाही. विराटने अफलातून खेळण्याबरोबरच अनेक मोठे विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. पण याबरोबरच एक असाही नकोसा विक्रम आहे जो विराटच्या नावावर आहे. तो म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये हिट विकेट होणारा भारताचा दुसरा कर्णधार.
१२ नोव्हेंबर २०१६ रोजी इंग्लंडविरुद्ध राजकोट येथे कसोटी सामना खेळत असताना विराट हिट विकेट झाला होता. झाले असे की या कसोटी सामन्याचा चौथा दिवस होता आणि भारतीय संघाकडून पहिल्या डावात विराट ४० धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी १२० वे षटक टाकण्यासाठी आदील राशिद आला. त्याने टाकलेल्या चेंडूवर विराटने पुलचा शॉट मारला. पण त्याचवेळी विराटचा डावा पाय स्टंपला लागला आणि स्टंपवरील बेल्स खाली पडल्या. त्यामुळे विराट हिट विकेट झाला आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. पुढे हा कसोटी सामना अनिर्णित राहिला.
त्यावेळी विराट कसोटीत हिट विकेट होणारा भारताचा एकूण २० वा खेळाडू, तर दुसराच कर्णधार ठरला. त्याच्याआधी लाला अमरनाथ हे १९४९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मद्रास (आत्ताचे चेन्नई) येथे भारताचे कर्णधार असताना हिट विकेट झाले होते.
विराट वनडे आणि कसोटत हिट विकेट
विराट कसोटीच्या आधी २०११ मध्ये इंग्लंड विरुद्ध कार्डिफ येथे वनडे सामन्यात खेळताना ग्रॅमी स्वानच्या गोलंदाजीवर हिट विकेट झाला होता. त्यामुळे जेव्हा २०१६ ला कसोटीतही हिट विकेट झाला, तेव्हा तो वनडे आणि कसोटी अशा दोन्ही क्रिकेट प्रकारात हिट विकेट होणारा दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. त्याच्या आधी नयन मुंगीने हा नकोसा विक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ड्वेन ब्रावो तू आता माझ्या मागे राहिलास’, असे का म्हणाला पोलार्ड, घ्या जाणून
‘या’ दोन युवा भारतीय क्रिकेटर्सचा फॅन झाला ब्रेट ली; म्हणाला…
कसोटीत ११ देशांत शतक करणारा जगातील एकमेव क्रिकेटर झाला पाकिस्तानचा फलंदाजी प्रशिक्षक
ट्रेंडिंग लेख –
ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण
आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान