आज सर डॉन ब्रॅडमन यांचा १०९वा जन्मदिवस. क्रिकेट जगतातील सर्वात महान फलंदाज म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख. त्यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ रोजी कूटामुद्रा, न्यू साऊथ वेल्स येथे झाला.
ब्रॅडमन यांच्या नावावर अनेक कसोटी विक्रम आहेत. परंतु एक असा विक्रम आहे जो कोणत्याही खेळाडूला आपल्या नावावर असलेला आवडणार नाही तो म्हणजे २९९ धावांवर नाबाद राहण्याचा. २९ जानेवारी १९३२ रोजी ऍडलेड कसोटीमध्ये ब्रॅडमन ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ब्रॅडमन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले आणि कसोटीमध्ये तीन वेळा ३०० धावा करण्याचा ब्रॅडमन यांचा विक्रम हुकला.
ब्रॅडमन यांचा कसोटीमधील सर्वाधिक स्कोर नाबाद ३३४ आहे. त्यांनी दोन वेळा कसोटीमध्ये ३०० धावा केल्या आहेत. २ वेळा ट्रिपल सेंचुरी करण्याचा विक्रम हा डॉन ब्रॅडमन, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल आणि ब्रायन लारा या दिग्गजांच्या नावावर आहे.
Photo: .espncricinfo.com