---Advertisement---

आजपासुन विक्रोळीत राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धाचा थरार…

On: गुरूवार, जानेवारी 10, 2019 12:43 PM
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्वराज्य प्रतिष्ठान विक्रोळी या संस्थेच्या वतीने दि. १० ते १४ जानेवारी २०१९ या कालावधीत कै. रवींद्र म्हात्रे क्रीडांगण, विकास कॉलेज समोर,कन्नमवार नगर-२ विक्रोळी पूर्व मुंबई ८३ येथे आमदार सुनील राऊत चषक व्यावसायिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ६:३० वाजता आमदार सुनील राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. व्यावसायीक पुरुष गटात उद्घाटन सामना महावितरण मुंबई विरुद्ध जे.जे.हॉस्पिटल मुंबई यांच्यात होणार आहे. तर व्यावसायिक महिला गटात मुंबई मनपा मुंबई विरुद्ध साई सिक्युरिटीज मुंबई यालढतीने सुरुवात होईल.

पुरुष व्यावसायिक गट

अ गट- एयर इंडिया मुंबई, सेंट्रल बँक मुंबई, मुंबई मनपा मुंबई, मध्य रेल्वे मुंबई

ब गट- भारत पेट्रोलियम मुंबई, यूनियन बँक मुंबई, महावितरण मुंबई, जे. जे. हॉस्पीटल मुंबई

क गट- महिंद्रा अँड महिंद्रा मुंबई, बँक ऑफ इंडिया मुंबई, साई औरंगाबाद, आर. के. इंजि. उपनगर

ड गट- नासिक आर्मी नाशिक, देना बँक मुंबई, मुंबई बंदर मुंबई, आय. डी. एल कोल्हापूर

व्यावसायिक महिला गट

अ गट- पश्चिम रेल्वे मुंबई, विजय श्री प्रोसेस मुंबई, जे. जे. हॉस्पीटल मुंबई

ब गट- देना बँक मुंबई, मुंबई मनपा मुंबई, साई सिक्योरिटीज मुंबई

क गट- ठाणे मनपा ठाणे, साई सिक्योरिटीज पुणे, एमराल्ड इन्फो मुंबई

ड गट- डब्लू. टी. इन्फा उपनगर, महावितरण मुंबई, अनुष्का ट्रैवल उपनगर, मिडॉस रायगड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment