---Advertisement---

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ

On: रविवार, जुलै 25, 2021 8:18 AM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक २०२० चा आज (२५ जुलै) तिसरा असून भारतीय नेमबाजांनी दिवसाची निराशाजनक सुरुवात केली. मात्र रियो ऑलिंपिकची रौप्य पदक विजेती आणि भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने तिच्या चाहत्यांना निराश केले नाही. तिने महिला एकेरी गटात, जे गटातील इस्रायलची प्रतिस्पर्धी केसिया पोलिकारपोव्हा हिला पराभवाची धूळ चारली आहे.

सिंधूने महिला एकेरी गटातील सामन्यात पोलिकारपोव्हाला २१-७, २१-१० अशा मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. हा सामना अवघे २८ मिनिटे चालला.

सिंधूने पहिल्याच सेटमध्ये पोलिकारपोव्हाविरुद्ध आक्रमक होऊन खेळण्यास सुरुवात केली होती. तिने पहिला सेट २१-७ अशा मोठ्या फरकाने जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही आपली लय कायम राखत तिने पोलिकारपोव्हाला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. तिने दुसरा सेटही २१-१० अशा फरकाने जिंकला आहे.

ऑलिंपकशी संबंधित बातम्या-

टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’

टोकियो ऑलिंपिक: मेरी कोम अन् पीव्ही सिंधू यासारखे स्टार खेळाडू उतरणार मैदानावर; पाहा २५ जुलैचं पूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---