---Advertisement---

कमलप्रीतने रचला इतिहास; फायनलमध्ये पोहोचणारी बनली दुसरी भारतीय महिला थ्रोअर

On: शनिवार, जुलै 31, 2021 9:07 AM
---Advertisement---

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मधील नवव्या दिवशी (३१ जुलै) भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. महिलांच्या डिस्कस थ्रो खेळात  सुरुवात झाली आहे. यामध्ये महिलांच्या डिस्कस थ्रो खेळात कमलप्रीत कौरने भारताची मान उंचावली आहे. क्वालिफिकेशन ग्रूप बीमध्ये चमकदार कामगिरी करत तिने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ६४ मीटरचा थ्रो केला. यासोबतच तिने टोकियो ऑलिंपिक्स २०२० च्या डिस्कस थ्रोच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळवले. असा कारनामा करणारी ती केवळ दुसरी भारताची महिला थ्रोअर आहे. तिच्यापूर्वी लंडन ऑलिंपिक्स २०१२ मध्ये कृष्णा पुनियाने ही कामगिरी केली होती.

यादरम्यान कमलप्रीतने आपल्या पहिल्या प्रयत्नात ६०.२९ मीटरचा थ्रो केला होता. त्यानंतर तिने दुसऱ्या प्रयत्नात ६०.९७ मीटरचा थ्रो केला आणि तिसऱ्या प्रयत्नात तिने अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी आवश्यक असलेला सर्वाधिक ६४ मीटरचा थ्रो केला. कमलप्रीतने केवळ आपल्याच ग्रूपमध्ये नाही, तर दोन्ही क्वालिफिकेशन ग्रूपमध्ये एकूण दुसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. (A 64m long throw in 3rd attemp takes Kamalpreet Kaur in the Discus Throw FINAL)

अव्वल क्रमांक अमेरिकेच्या व्हॅलेरी ऑलमनने पटकावला. तिने ६६.४३ मीटरचा थ्रो करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या दोघींव्यतिरिक्त ग्रूपमध्ये कोणत्याही ऍथलिटला ६४ मीटरचा आकडा पार करता आला नाही. अशामध्ये कमलप्रीत पदक जिंकण्याची शक्यता वाढली आहे.

यापूर्वी झालेल्या डिस्कस ग्रूप एमध्ये एशियन गेम्समध्ये दोन वेळा पदक जिंकणारी भारतीय ऍथलिट सीमा पुनियानेही भाग घेतला होता. यामध्ये तिने आपले सर्वोत्तम देत ६०.५७ मीटरचा थ्रो करत गुणतालिकेत ६ वा क्रमांक पटकावला होता. मात्र, ती अंतिम फेरीत प्रवेश मिळवू शकली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---