टोकियो ऑलिंपिक २०२० च्या तिसऱ्या दिवशी (२५ जुलै) भारताची स्टार नेमबाज मनु भाकरने निराश केले आहे. तिला महिला १० मीटर एअर पिस्टलच्या पात्रता फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पात्रता फेरीत मनु भाकर ५७५/ ६०० गुणांसह १२ व्या स्थानावर राहिली. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी तिला टॉप ८ मध्ये येणे गरजेचे होते. तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र, ती या अपेक्षांचं ओझं वाहण्यात अपयशी ठरली.
‘या’ कारणामुळे झाला पराभव
या महत्त्वाच्या सामन्यात मनुला तिच्या बंदुकीनेच धोका दिला. दुसऱ्या सीरिजमध्ये मनुच्या बंदुकीच्या इलेक्ट्रॉनिक ट्रिगरमध्ये सर्किटची समस्या होती. १९ वर्षीय मनुला तेव्हा प्रशिक्षक आणि ज्युरीच्या एका सदस्यासह टेस्ट टेंटमध्ये जावे लागले, जिथे ते बदलण्यात आले. (Tokyo Olympics 2020 Indian Shooter Manu Bhaker Pistol Malfunction Qualification)
Manu Bhaker and Yashaswini Singh Deswal, 10m Air Pistol shooters from #IND, end 12th and 13th in the qualification rounds.
Hard luck, girls. Well played 👏#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion
— Olympic Khel (@OlympicKhel) July 25, 2021
ही पूर्ण प्रक्रिया मनुला चांगलीच महागात पडली आणि तिला ५७५ गुणांवरच समाधान मानावे लागले. तरीही मनुने ५ व्या सीरिजमध्ये पुनरागमन केले होते. या सीरिजमध्ये तिने ९८ गुणांची कमाई केली होती. मनुसाठी हा एक कठीण दिवस होता. कारण, तिला तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला आणि तिसऱ्या सीरिजमध्ये ती ५ मिनिटांपर्यंत नेमबाजी करू शकली नाही.
#Tokyo2020 | 10m Air Pistol Women's qualification: Manu Bhaker and Yashaswini Singh Deswal fail to make it to medal round
(In file photo: Manu Bhaker) pic.twitter.com/3xKchjOEGL
— ANI (@ANI) July 25, 2021
यशस्विनीचाही पराभव
मनु व्यतिरिक्त या सामन्यात भारताच्या यशस्विनी सिंग देसवालचाही समावेश होता. तिलाही इथे पराभवाचं पाणी चाखावं लागलं. देसवाल ५७४ गुणांसह ती १३ व्या क्रमांकावर राहिली. अव्वल क्रमांक चीनची जियान रानशिंगने पटकावला. तिने ५८७ गुण मिळवले. दुसरीकडे यूनानच्या अन्ना कोराक्की दुसऱ्या आणि रूस ऑलिंपिक समितीची बी वितालिना तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ