टोकियो ऑलिपिंक २०२० मध्ये शनिवारी (२४ जुलै) वेट लिफ्टिंगमध्ये भारताच्या नावावर एका पदकाची नोंद झाली. महिला वेट लिफ्टिंग खेळात ४९ किलो वजनी गटात भारतीय वेट लिफ्टर मिराबाई चानूने रौप्य पदक जिंकले. तसेच ती टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडूही ठरली.
हे ऐतिहासिक पदक जिंकल्यानंतर मिराबाईने पिझ्झा आणि आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिने सांगितले होते की, तिने महिन्यांपासून आपले आवडते पदार्थ खाल्ले नाहीत. (Tokyo Olympics 2021 Dominos India Offers Free Pizza To Mirabai Chanu After Won Silver Medal)
ऑलिंपिक मेडल जिंकल्यानंतर ती म्हणाली होती की, “मी अनेक महिन्यांपासून पिझ्झा आणि आईस्क्रीम खाल्ले नाहीत.” तिच्या या कमेंटनंतर आघाडीची पिझ्झा कंपनी डॉमिनोजने मिराबाईला आयुष्यभर मोफत पिझ्झा देण्याची घोषणाही केली आहे.
डॉमिनोजने ट्वीट करत लिहिले की, “पदक घरी आणल्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एक अब्जापेक्षा अधिक भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले आहे. यापेक्षा आनंदाची गोष्ट इतर कोणतीही नसेल की, आम्ही तुम्हाला आयुष्यभर मोफत पिझ्झा देऊ. पुन्हा एकदा अभिनंदन.”
@Mirabai_chanu Congratulations on bringing the medal home! 🙌🏽🥈You brought the dreams of a billion+ Indians to life and we couldn’t be happier to treat you to FREE Domino’s pizza for life 🍕😊
Congratulations again!! #DominosPizza #PizzasForLife #Tokyo2020 #MirabaiChanu https://t.co/Gf5TLlYdBi— dominos_india (@dominos_india) July 24, 2021
मिराबाई म्हणाली की, “ऑलिंपिकमध्ये अपयशी राहिल्यानंतर मी खूपच निराश झाले होते. मी २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकले होते. यानंतर मी ऑलिंपिकबद्दल विचार करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी मी ऑलिंपिक पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते.”
She said it, we heard it🙏
We never want @mirabai_chanu to wait to eat 🍕 again so we’re treating her to FREE Domino’s pizza for life! #PizzasForLife— dominos_india (@dominos_india) July 24, 2021
Aapne kaha, aur humne sunn liya 🙏
We never want @mirabai_chanu to wait to eat 🍕 again so we’re treating her to FREE Domino’s pizza for life! #PizzasForLife— dominos_india (@dominos_india) July 24, 2021
मिराबाईने वेट लिफ्टिंगमध्ये स्नॅच ८७ किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये ११५ किलो असे एकूण २०२ किलो वजन उचलले. या खेळात चीनच्या झू लिजुनच्या सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ