रविवारी (०१ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिक २०२० च्या बॉक्सिंग खेळामध्ये भारताची पदकाची आणखी एक आशा मावळली आहे. सुपर हेवीवेट प्रकारात भारताच्या सतीश यादवला उझबेकिस्तानच्या बखोदिर जलोलोवने एकतर्फी लढतीत ५-० ने पराभूत केले आहे. बखोदिर जलोलोवने संपूर्ण सामन्यात सतीशला कोणतीही संधी दिली नाही. त्यामुळे त्याचा पराभव झाला. यानंतर त्याच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जलोलोव एकमताने विजेता बनला
सतीशने पहिल्या फेरीत प्रयत्न केला. पण सर्व परीक्षकांनी जलोलोवला १०, तर सतीशला ९ गुण दिले. परिणामी त्याने पहिली फेरी गमावली. त्यानंतर दुसऱ्या फेरीतही पुन्हा तेच घडले आणि सतीश यादवला पराभवासह स्पर्धेच्या बाहेर पडावे लागले. सतीशने गुरुवारी जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला ९१ किलो वजनी गटातील शेवटच्या १६ फेरीच्या सामन्यात ४-१ ने पराभूत केले होते आणि उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळवले होते.
सतीशच्या वडिलांची प्रतिक्रिया
सतीश यादवचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाल्यानंतर वडिलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सतीश यादवच्या वडिलांनी सांगितले की, “तो उपांत्यपूर्व फेरीत जखमी झाला होता. उपउपांत्यपूर्व फेरीत सतीशच्या भुवया आणि हनुवटीवर अकरा टाके पडले होते. तरीही त्याने धैर्याने उपांत्यपूर्व फेरीत लढत दिली. तो पराभवानंतर खूप निराश झाला होता. पण आम्ही त्याला प्रोत्साहन दिले.”
सतीशने रविवावरचा सामना जिंकला असता तर भारताला बॉक्सिंगमध्ये आणखी एक पदक मिळाले असते. परंतु सतीशला पराभवाचा सामना करावा लागला. त्याच्या या पराभवाने सर्वांनाच धक्का बसला आहे. यापूर्वी महिलांच्या बॉक्सिंग खेळात लवलिना बोर्गोहेनने उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक पक्के केले होते. बॉक्सिंगमध्ये भारताची एकमेव आशा आता लवलिना आहे आणि उपांत्य फेरी जिंकत ती अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा पहिला सुपर हेवीवेट बॉक्सर सतीश कुमार क्वार्टर फायनलमध्ये पराभूत; संपला ऑलिंपिकमधील प्रवास
सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर सिंधूला वडिलांचा पाठिंबा; म्हणाले, ‘पराभव विसरून…’