टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये शनिवारी (२४ जुलै) भारताला वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळाले. ही खास कामगिरी केलीय भारतीय महिला वेट लिफ्टर मिराबाई चानूने. विशेष म्हणजे ऑलिंपिकमध्ये भारतासाठी वेट लिफ्टिंगमध्ये ‘रौप्य’ पदक जिंकणारी पहिली महिला बनली आहे. यासोबतच हे ऑलिंपिक २०२० मध्ये भारताचे पहिले पदक आहे. तसेच तिने आपल्या नावावर एक विक्रमही केला आहे. ती ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरी यांनी ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये पहिले पदक जिंकले होते.
या कामगिरीनंतर मिरावर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आज ती एका मानाच्या स्थानावर आहे. मात्र, तिचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा नक्कीच सोपा नव्हता. तिने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच विजय मिळवण्याची जिद्द ठेवली होती, जी आज पूर्ण झाली. (Tokyo Olympics Story of Indian Wrestler Mirabai Chanu Life She Has Won Many Medals Before)
जेव्हा मिराची ताकद पाहून भाऊही झाला हैराण
मिराचा जन्म ८ ऑगस्ट, १९९४ मध्ये नोंगपोक काकचिंग, इंफाल, मणिपूरमध्ये एका मेती कुटुबात झाला होता. मिराची ताकद तिच्या कुटुंबाने लहानपणापासूनच पाहिली होती. जेव्हा जंगलातून लाकडं तोडून घरी आणले जायचे, तेव्हा त्यात मिराचे सर्वात मोठे योगदान असायचे. त्यावेळी तिचा मोठा भाऊ सैखोम सनातोंबा मेतीदेखील हैराण झाला होता.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Weightlifting
Women's 49kg ResultsSilver lined beginning for India! @mirabai_chanu wins Silver medal in @Tokyo2020 Weightlifting becoming the only 2nd Indian weightlifter ever to win an #Olympics medal. #WayToGo champ #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/oNqElqBGU2
— Team India (@WeAreTeamIndia) July 24, 2021
झाले असे की, लाकडांची मोठी मोळी जेव्हा तो उचलू शकत नव्हता, तेव्हा मिरा ते उचलून घरी घेऊन जात होती. त्यावेळी मिरा जवळपास १२ वर्षांची होती आणि इतक्या कमी वयात तिची ताकदीने कुटुंबालाही हैराण केले.
https://www.instagram.com/p/CRN6rfds_cp/?utm_source=ig_web_copy_link
आई चालवायची दुकान
मिराचे बालपण हे खूपच संकटांनी भरलेले होते. तिच्या घरात आर्थिक समस्याही होत्या. तिची आई एक छोटे दुखान चालवायची. दुसरीकडे वडील लहान- मोठे काम करून पैसे कमवून घर चावलायचे. इतकेच नव्हे, तर मिराला ट्रेनिंग करणेही सोपे नव्हते. कारण, तिच्या घराच्या जवळपास कोणतेही ट्रेनिंग सेंटर नव्हते. ट्रेनिंगसाठी तिला रोज ६० किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. सन २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा मिराने ‘सुवर्ण’ पदक मिळवले होते, तेव्हा या काामगिरीसाठी तिला मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांकडून २० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते.
https://www.instagram.com/p/CMKFcDrMRB2/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वीही जिंकली आहेत पदकं
सन २०१४ पासून ४८ किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिराने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये जागतिक चॅम्पियनशिप आणि अनेक पदकं आपल्या नावावर केली आहेत. खेळात योगदान देण्यासाठी तिला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मिराला २०१८ मध्ये भारत सरकारकडून राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. तिने २०१४ राष्ट्रकुल स्पर्धा, ग्लासगो मध्ये महिलांच्या ४८ किलो वजनी गटात ‘रौप्य’ पदक आपल्या नावावर केले होते. त्यानंतर तिने ‘गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धे’च्या २०१८ हंगामात ‘सुवर्ण’ पदक जिंकून विक्रम मोडला होता.
https://www.instagram.com/p/BmfbNajlldd/?utm_source=ig_web_copy_link
मिराने करिअरमधील सर्वात मोठी कामगिरी सन २०१७ मध्ये केली होती. तिने यूएसएच्या अनाहेममध्ये आयोजित जागतिक वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ‘सुवर्ण’ पदक जिंकले होते. तिने २०१९ आशियाई वेट लिफ्टिंगच्या ४९ किलो वजन गटात क्लीन एँड जर्कमध्ये कांस्य पदक जिंकून टोकिया ऑलिंपिकसाठी क्वालिफाय केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी! भारतीय वेट लिफ्टर मीराबाई चानूची रुपेरी कामगिरी, जिंकले रौप्य पदक
-भारताच्या अपेक्षांवर पाणी! चीनविरुद्ध टेबल टेनिसच्या मिश्र गटात शरत अन् मनिका पराभूत
-भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर ३-२ ने दणदणीत विजय, गोलकिपर श्रीजेश ठरला नायक