नवी दिल्ली। क्रिकेटच्या मैदानात तुम्ही बऱ्याच फलंदाजांना बाद होताना पाहिलं असेल. परंतु न्यूझीलंडमधील देशांतर्गत स्पर्धेतील फलंदाज टॉम ब्लंडेल विचित्र पद्धतीने बाद झाला. हे दृश्य तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटेल. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडचा क्रिकेटर टॉम ब्लंडेल याला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे बाद घोषित करण्यात आले. 24 तासांपूर्वीच टॉमने प्लँकेट शिल्ड स्पर्धेत शानदार शतक ठोकले होते. पण या डावात त्याला विचित्र पद्धतीने बाद घोषित करण्यात आले.
चेंडूचा बचाव करण्याचा केला प्रयत्न
टॉम ब्लंडेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. बेसिन रिझर्व्हच्या मैदानावर टॉमने जेकब डफीचा चेंडू यष्टीच्या दिशेने खेळला. चेंडू यष्टीला लागणारच होता, त्याआधी त्याने चेंडूला पायाने रोखण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा चेंडू यष्टीवर जाऊन आदळणार असे त्याला वाटले, तेव्हा त्याने लगेच चेंडूचा हाताने बचाव केला.
🚨 WEIRD DISMISSAL KLAXON 🚨
Tom Blundell was dismissed for obstructing the field in the Plunket Shield!
Also, as an aside, can we just appreciate how many woolly hats are being worn… 🤣pic.twitter.com/hEhQfDIXl7
— The Googly Cricket (@officialgoogly) November 8, 2020
…म्हणून टॉम झाला बाद
क्रिकेटच्या नियमांनुसार बॅट मारल्यानंतर चेंडू यष्टीच्या दिशेने जात असेल, तर फलंदाज त्यास पायाने रोखू शकतो. परंतु चेंडू हाताने थांबवने नियमांच्या विरोधात आहे. म्हणून टॉमला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याप्रकरणी बाद घोषित करण्यात आले.
नियमात झाला बदल
चेंडूला हाथ लावणाऱ्या फलंदाजाला यापूर्वी हॅन्डल द बॉल या नियमानुसार बाद घोषित करण्यात येत होते. परंतु सन 2017 मध्ये नियम बदलण्यात आले. आता चेंडूला हात लावणारा फलंदाज क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याप्रकरणी बाद घोषित होतो.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर
-RCB आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराटने बदललं वास्तव्य; पाहा काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
-RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा