24 जानेवारीपासून भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये 5 टी20 सामने, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. टी20 मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होईल. मात्र या मालिकेआधीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.
त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम टी20 मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनीमध्ये नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात त्याची करंगळी फ्रॅक्चर झाली आहे. त्यामुळे या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला 4 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.
याबरोबरच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या टी20 मालिकेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्नला झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान मिशेल स्टार्कचा चेंडू हाताला लागल्याने बोल्टच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
याबद्दल न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘एक्स-रे काढल्यानंतर टॉम लाथमच्या करंगळीला फ्रॅक्चर असल्याची पुष्टी झाली आहे. त्यामुळे यातून सावरण्यासाठी त्याला सुमारे चार आठवड्यांचा कालावधी लागेल’
त्याचबरोबर बोल्टच्या दुखापतीबद्दल न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी म्हटले आहे की तो सध्या विश्रांती घेत असून पुढच्या आठवड्यात गोलंदाजीला सुरुवात करेल. पण भारताविरुद्धच्या टी20 मालिकेतील सहभागाबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही.
…म्हणून पुणे टी२०मध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी शार्दुलची होणार नाही हॅट्रिक
वाचा👉https://t.co/nrLleqrGY9👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvSL @imShard— Maha Sports (@Maha_Sports) January 9, 2020
https://twitter.com/Maha_Sports/status/1215213096366559232