---Advertisement---

टॉप १०: टीम इंडिया पराभूत, परंतु या १० विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

---Advertisement---

बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (4 आॅगस्ट) 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.

भारतासमोर ही कसोटी जिंकण्यासाठी दुसऱ्या डावात 194 धावांचे आव्हान होते. पण भारताचा डाव 162 धावांतच संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

या सामन्यात इंग्लंडचा युवा खेळाडू सॅम करनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. हा सामना इंग्लंडचा 1000 वा कसोटी सामना होता.

या सामन्यात दोन्ही संघांमधून एकमेव विराट कोहलीने शतक केले आहे.

या सामन्यात अनेक विक्रमही झाले ते असे-

1.विराट कोहली एका कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा 200 किंवा 200 पेक्षा अधिक धावा करणारा भारतीय खेळाडू. त्याने 11 वेळा केली आहे अशी कामगिरी. त्याच्या पाठोपाठ सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड 10 वेळा.

2. विराट कोहली एका कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा 200 किंवा 200 पेक्षा अधिक धावा करणारा कर्णधार. त्याने 36 सामन्यात 9 वेळा केली आहे अशी कामगिरी. त्याच्या पाठोपाठ ७- ब्रायन लारा (सामने- 47), 7- रिकी पाॅंटींग (सामने- 77), 6- डाॅन ब्रॅडमन (सामने- 24)

3. विराट कोहली पराभूत कसोटी सामन्यात सर्वाधिक 5 शतके करणारा कर्णधार. ब्रायन लारा यांचेही या यादीत 5 शतके.

4. वयाची 21 पुर्ण करण्यापुर्वीच सामनावीर ठरलेला सॅम करन इंग्लंडचा पहिलाच खेळाडू.

5. परदेशात कमी धावांनी भारताच्या झालेल्या पराभवांपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा पराभव. याआधी आॅस्ट्रेलिया विरुद्ध ब्रिसबेन येथे 1977 मध्ये झाला होता 16 धावांनी पराभव.

6. 1962 पासून एजबस्टन मैदानावर झालेल्या 17 सामन्यात एकदाही आशियाई संघाला विजय मिळवता आला नाही.

7. ह्या सामन्यातील विराट कोहली आणि उमेश यादव यांच्यात झालेली 57 धावांची भागीदारी ही भारताची दोन्ही डावातील सर्वोच्च भगीदारी

8. एका कसोटी सामन्यात दोन्ही डावात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय कर्णधार. एमएस धोनी आणि कोहली दोघांनीही 4 वेळा केली आहे अशी कामगिरी

9. इंग्लंडमध्ये एका कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळणारा विराट कोहली दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय कर्णधार. ह्या सामन्यात विराटने खेळले 318 चेंडू. अव्वल क्रमांकावर 554 चेंडूसह पतौडी.

10. ह्या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचे 3 फलंदाज 13 धावांवर बाद. एका कसोटी सामन्यात 13 धावांवर तीन फलंदाज बाद होण्याची ही कसोटी क्रिकेटमधील 7 वी वेळ. याआधी 1991 मध्ये पहिल्यांदाच असे घडले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहली सोडून बाकी सर्व बुजगावणी…चाहते कडाडले

कोहलीचा पुन्हा एकदा नवा कारनामा, एजबस्टन गाजवले

-अमुलकडून कर्णधार विराट कोहलीच्या खेळीला खास मानवंदना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment