भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात भारताकडून अनेक क्रिकेटपटुंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर क्रिकेट खेळले. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा तीनही प्रकारात काही क्रिकेटपटू देशाकडून खेळले.
स्वातंत्र्याच्या या ७० वर्षात अर्थात १५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०१७ या काळात भारताकडून अनेक क्रिकेटपटुंनी अनेक विक्रम केले. त्यातील खास टॉप १० विक्रमांचा हा आढावा !
१. भारताकडून ५०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे क्रिकेटर
सचिन तेंडुलकर (६६४) आणि राहुल द्रविड (५०४)
२. भारताकडून सर्वाधिक आंतराराष्ट्रीय धावा करणारे दोन क्रिकेटपटू
सचिन तेंडुलकर (३४३५७) आणि राहुल द्रविड (२४०६४)
३. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर (१००), राहुल द्रविड (४८) आणि विराट कोहली (४५)
४. भारताकडून सर्वाधिक नाबाद खेळी करणारे खेळाडू
एमएस धोनी(११८), सचिन तेंडुलकर (७४)
५. भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक एका डावात धावा करणारे खेळाडू
वीरेंद्र सेहवाग (३१९), वीरेंद्र सेहवाग (३०९),
६. सर्वाधिक सरासरी राखणारे खेळाडू (कमीतकमी २००० धावा)
विराट कोहली(५२.७४), विजय हजारे (५०.४६), चेतेश्वर पुजारा(५०.०९)
७. सर्वाधिक अर्धशतके करणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर (१६४), राहुल द्रविड (१४५)
८.सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू
अनिल कुंबळे (९५३), हरभजन सिंग (७०७)
९. सर्वाधिक चेंडू गोलंदाजी करणारे खेळाडू
अनिल कुंबळे (५५२२६), हरभजन सिंग (४१५५१)
१०.सार्वधिक चांगली गोलंदाजी सरासरी असणारे खेळाडू(कमीतकमी १०० बळी)
आर अश्विन (२७.३४), मोहम्मद शमी (२७.८४)
११.सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू
राहुल द्रविड (३३३), मोहम्मद अझरुद्दीन (२६१)
(सर्व आकडेवारी ही १५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०१७ या काळातील कसोटी, एकदिवसीय सामने आणि आंतराराष्ट्रीय टी२० सामने मिळून आहे. )