भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या व अत्यंत महत्त्वाच्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाला पाचव्या दिवशी 328 धावांचे लक्ष पार करायचे आहे. भारतीय क्रिकेट प्रेमींना ही कामगिरी अतिशय आव्हानात्मक वाटत असली तरी यापूर्वी देखील भारतीय संघाने दोन वेळा 300 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य पार केलेले आहे.
1) 406 धावा – विरुद्ध वेस्टइंडीज (1976)
भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध 406 धावांचे लक्ष पार केलेले आहे. विशेष म्हणजे भारताने ही कामगिरी 1976 साली केलेली असून तेव्हा वेस्ट इंडिज संघ जगातील सर्वोत्तम मानला जात असे.
पोर्ट ऑफ स्पेन मध्ये झालेल्या या सामन्यात 406 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील गावसकर व गुंडप्पा विश्वनाथ यांनी शतकी खेळी केली होती. मोहिंदर अमरनाथ यांनी देखील 81 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे भारताने केवळ 4 गडी गमावत हे लक्ष पार केले होते.
2) 387 विरुद्ध इंग्लंड ( 2008)
चेन्नई येथे 2008 साली इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 387 धावांचे लक्ष पार केले होते. फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या चेन्नईच्या खेळपट्टीवर, भारत इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करेल याची कल्पना देखील कोणत्याही भारतीय समर्थकाला नसेल.मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शानदार शतकीय खेळीमुळे भारताने हे लक्ष केवळ 4 फलंदाज गमावत पूर्ण केले. भारताकडून या सामन्यात वीरेंद्र सेहवागने 83, युवराज सिंगने 85 आणि गौतम गंभीरने 66 धावांची खेळी केली होती.
ब्रिस्बेन कसोटीत देखील 328 धावांचा पाठलाग करताना भारतीय क्रिकेटरसिकांना आशा असेल की कर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा हे तीन स्टार खेळाडू उत्तम कामगिरी करून संघाला विजय मिळवून देतील.
महत्वाच्या बातम्या:
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : सांघिक कामगिरीच्या बळावर बडोदा बाद फेरीत, गुजरातचा केला पराभव
आयएसएल २०२०-२१ : दहा खेळाडूंनिशी ईस्ट बंगालने चेन्नईयीनला रोखले