इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये अनेक सामन्यांमध्ये काट्याची टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बऱ्याचदा शेवटच्या चेंडूंवर संघांनी सामने जिंकल्याचे आपण पाहिले आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने कितीही जास्त धावा केल्या, तरीही त्यांच्या विजयाची गॅरंटी नसते. कारण लक्ष्याचा पाठलाग करताना अधिकतर संघ विजयाच्या नजीक पोहोचण्यासाठी पूर्ण जोर लावतात. मात्र काहीवेळा संघांवरील दबाव वाढतो आणि त्यांच्यावर मोठ्या अंतराने सामना गमावण्याची नामुष्की ओढावते. आयपीएलमध्ये फार क्वचित असे सामने पाहायला मिळतात.
या लेखात अशाच काही सामन्यांचा आढावा घेतला गेला, ज्यांमध्ये आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघांनी प्रतिस्पर्धांपुढे गुडघे (Biggest Victories In IPL By Huge Margins) टेकले आणि १०० पेक्षाही जास्त अंतराने सामने गमावले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांच्या अंतराने जिंकलेले सामने-
१. १४६ धावा, मुंबई इंडियन्स – विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
आयपीएलमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या अंतराने विजय मिळवण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई संघाने २०१७ आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सला १४६ धावांच्या अंतराने पराभूत केले होते. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ ६६ धावांवरच सर्वबाद झाला होता.
२. १४४ धावा, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विरुद्ध गुजरात लायन्स
मुंबई इंडियन्सपाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. बेंगलोर संघाने २०१६ साली गुजरात लायन्स संघावर १४४ धावांनी मात केली होती. या सामन्यात बेंगलोर संघाने गुजरातपुढे २४९ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल गुजरात संघाला १०४ धावाच करता आल्या होत्या.
३. १४० धावा, कोलकाता नाईट रायडर्स – विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
आयपीएलमध्ये मोठ्या अंतराने विजय मिळवण्याच्या बाबातीत कोलकाता नाईट रायडर्स संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाता संघाने आयपीएलच्या पहिल्या हंगामात अर्थात आयपीएल २००८ मध्ये बेंगलोर संघाला १४० धावांच्या अंतराने पराभूत केले होते. या सामन्यात कोलकाताने २२२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बेंगलोर संघ ८२ धावाच करू शकला.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लुईसचा ‘हँड्स ऑफ गॉड’ कॅच ठरला IPL 2022मधील सगळ्यात भारी! पालटून टाकलेलं सामन्याचं चित्र
विश्वासच बसत नाहीये! गुजरातने एकाही सामन्यात केले नाही ‘हे’ काम, तरीही जिंकली ट्रॉफी
ए भावा थांब! अर्ध्यापेक्षा जास्त अवॉर्डचे पैसे एकटा बटलर गेला घेऊन, ‘इतक्या’ वेळा आला स्टेजवर