कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० ला त्रिनिदाद मध्ये त्रिनबॅगो नाईट रायडर्स व गयाना ऍमेझॉन वॉरियर्सच्या सामन्यांने सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रोमन पॉवेलच्या नेतृत्वात खेळणारा जमैका तल्लावाझ व वेस्ट इंडिज संघाला दोन वेळेस टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवुन देणाऱ्या डॅरेनच्या सॅमीच्या नेतृत्वात खेळणारा सेंट ल्युसिया झुक्सचा संघ एकमेकांविरोधात उभे राहतील.
दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे त्यामुळे दोन्ही संघ सत्राची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक असतील. दोन्ही संघांचा विचार करता सेंट ल्युसिया झुक्स संघात अनुभवाची कमतरता जाणवते.
जमैका तल्लावझ विरुद्ध सेंट ल्युसिया झुक्सच्या सामन्यांत या ३ खेळाडुंवर असेल नजर
आंद्रे रसेल – जमैका संघाचा महत्त्वाच भाग असलेल्या रसेलमध्ये एकतर्फी सामना फिरवण्याची क्षमता आहे. तसेच फलंदाजीसोबतच त्याचे गोलंदाजींतील योगदान मोलाचे ठरते. सीपीएल इतिहासात सर्वात जलद शतक झळकावण्याचा मान ही त्याच्याच नावे आहे. कोणत्याही चेंडूला सीमारेषेपार भिरकावण्याची क्षमता रसेलला मर्यादित षटकांच्या सामन्यांत महत्त्व निर्माण होते.रसेल सुद्धा नव्या सत्राची धडाक्यात सुरुवात करण्यास उत्सुक असेल.
मोहम्मद नबी – टी-२० क्रिकेट म्हटले की फलंदाजां बरोबरच अष्टपैलु खेळाडुंचे महत्त्व कमी नाही. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी हा खेळाडु जगातील बहुतेक प्रत्येक टी-२० स्पर्धांमध्ये खेळला आहे. प्रत्येक ठिकाणी त्याने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही आपला करिष्मा दाखवला आहे. अशाच कामगिरीची अपेक्षा सेंट ल्युसिया संघाच्या समर्थकांना असेल; तसेच त्याच्या अनुभवाचा फायदाही मोलाचा ठरेल.
ग्लेन फिलिप्स – २०१९ च्या आपल्या पहिल्याच सत्रात फलिप्सने क्रिकेट समीक्षकांचे लक्ष्य वेधुन घेतले होते. आपल्या पहिल्याच सत्रात त्याने १० सामन्यांत १४४.९६ च्या स्ट्राईक रेटने ३७४ धावा धावा ठोकल्या होत्या. पण तो संघाला पहिल्या ४ संघात पोहचवू शकला नव्हता. पण त्याने मागील मोसमात ज्या प्रकारे फलंदाजी केली होती तशाच शानदार कामगिरीची अपेक्षा जमैका संघाला असेल.
जमैका तल्लावाझ – रोमन पॉवेल (कर्णधार), आंद्रे रसेल, ग्लेन फिलिप्स, ओशेन थॉमस, चाडविक वॉल्टन, संदिप लामिछाने, कार्लोस बार्थेवट, असिफ अली, फिडेल एडवर्ड, प्रेस्टन मॅकस्विन, निकोलस किर्टन,क्रुमाह बोनेर,विरस्वामी परमॉल, रॅन परसॉड,जेरमिन ब्लॅकवुड, मुजीब उर रहेमान,रमाल लेविस
सेंट ल्युसिया झुक्स – डॅरेन सॅमी (कर्णधार),मोहम्मद नबी, आंद्रे फ्लेचर, केसरिक विल्यम, रखिम कॉर्नेल, केमर होल्डर, जावेल ग्लेन, मार्क देयल, लेनिको बाऊचर, काविम हॉज, ओबेद मॅकॉय, किमानी मेलियस,साद बिन जफर,स्कॉट कुगेनिन,रोस्टन चेस, नजिबुल्लाह झदरान, झहीर खान