इंडियन प्रीमीयर लीग 2021 स्पर्धेला गेल्या महिन्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली होती. मात्र, या हंगामाचा दुसरा टप्पा सुरु होताच कोरोना व्हायरसचे संकट संघांच्या बायोबबलमध्ये अचानक वाढले. त्यामुळे मंगळवारी (४ मे) हा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र तरीदेखील या स्पर्धेदरम्यान झालेल्या सामन्यांमध्ये क्रिकेट रसिकांना शानदार रोमांच बघायला मिळाले. अनेक फलंदाज व गोलंदाजांनी आपल्या शानदार कामगिरीतून क्रिकेट पंडितांची वाहवा मिळवली. विशेषत: आयपीएल 2021 मध्ये फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. आपण या लेखात बघणार आहोत असे टॉप 5 फलंदाज ज्यांनी संघाच्या एकूण धावसंख्येत सर्वाधिक धावांचे योगदान दिले.
१) केएल राहुल – आयपीएल 2021 मधील पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार के एल राहुल स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच शानदार फॉर्ममध्ये होता. आयपीएल 2021 मध्ये राहुलने 7 सामन्यांमध्ये फलंदाजी केली व त्याने 66.20 च्या उत्कृष्ट सरासरीने 331 धावा केल्या. यावेळी त्याने 4 अर्धशतकेही झळकावली. विशेष म्हणजे संघाच्या एकूण धावांपैकी राहुलने 32 टक्के धावा एकट्याने केलेल्या आहेत.
2) शिखर धवन – दिल्ली कॅपिटल्स संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन आयपीएल 2021 मध्ये धमाकेदार फॉर्ममध्ये होता. या हंगामाच्या सुरूवातीपासूनच धवन उत्तम फलंदाजी करत होता. या सिझनमध्ये धवनने 8 सामन्यात 54.28 च्या उत्कृष्ट सरासरीने 380 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 3 अर्धशतके देखील झळकावली. दिल्लीच्या आयपीएल 2021 मधील एकूण धावांमध्ये धवनचे योगदान 29.9 टक्के होते.
3) फाफ डु प्लेसिस – दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. फाफ डू प्लेसिसने आयपीएल 2021 मध्ये आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. डू प्लेसिसने 7 सामन्यात 64 च्या उत्कृष्ट सरासरीने 320 धावा केल्या. डू प्लेसिसचे चेन्नईच्या एकूण धावांपैकी 26.1 टक्के धावा केल्या.
4) मनीष पांडे – मनीष पांडे आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत होता. या हंगामात मनीषने 5 सामन्यात 48.25 च्या सरासरीने 193 धावा केल्या. यावेळी त्याने 2 अर्धशतके देखील केली. मनिषने आयपीएल 2021 मध्ये संघाच्या एकूण धावांपैकी 25.6 टक्के धावा एकट्याने केल्या.
5) मयंक अगरवाल – मयंक अगरवालने पंजाब किंग्सकडून खेळताना 7 सामन्यांत 43.33 च्या सरासरीने 260 धावा केल्या आहेत. यावेळी, त्याने 2 अर्धशतके झळकावली. त्याने एका सामन्यात केएल राहुलच्या अनुपस्थितीत पंजाबचे कर्णधारपद देखील भूषवले. यावर्षी मयंकने पंजाब किंग्जच्या एकूण धावांपैकी 25.5 टक्के धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनाने घेतला आणखी एका क्रिकेटरचा बळी; राजस्थानचा रणजीपटूने अवघ्या ३६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
‘या’ कारणामुळे कोरोनाची लागण झालेल्या माईक हसी, बालाजीला एअर ॲम्ब्युलन्सद्वारे हलवण्यात आले चेन्नईत
आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाली असली तरी लवकरच ‘ही’ मोठी स्पर्धा येणार क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला






