महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना शुक्रवारी (30 जून) खेळला गेला. पावसामुळे सामना पूर्ण होऊ गुरुवार ऐवजी शुक्रवारी आयोजित केला गेला. पण शुक्रवारी देखील मैदानात पावसाने हजेरी लावली. अखेर रत्नागिरी जेट्स संघाला गुणतालिकेच्या आधारे विजेतेपद दिले गेले. कुल्हापूरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आपण या लेखात एमपीएल 2023 हंगामात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या पाच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत.
पुणेरी बाप्पा संघाला एमपीएल 2023 (MPL 2023) दरम्यान चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यांचा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. क्वॉलिफायर दोनमध्ये त्यांना कोल्हापूर टस्कर्स संघाकडून पुण्याला पराभव स्वीकारावा लागाल. मात्र सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत पुणे संघाच्या दोन खेळाडूंची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. सचिन भोसले आणि पियुष साळवी यांनी प्रत्येकी 14 आणि 12 विकेट्स एमपीएल 2023 हंगामात घेतल्या आहेत. कोल्हापूर टस्कर्स संघाचा मनोज यादव यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 11 विकेट्स घेतल्या आहेत.
एमपीएल 2023 हंगामात सर्वाधिक विकेट्स गेणारे गोलंदाज
सचिन भोसले – 14 विकेट्स (पुणेरी बाप्पा)
पियुष साळवी – 12 विकेट्स (पुणेरी बाप्पा)
मनोज यादव – 11 विकेट्स (कोल्हापूर टस्कर्स)
रोहन दामले – 9 विकेट्स (पुणेरी बाप्पा)
विजय पावले – 9 विकेट्स (रत्नागिरी जेट्स)
रोहन दामले पुणेरी बाप्पाचा खेळाडू असून त्याच्या नावावर 9 विकेट्स आहेत आणि यादीत तो चौथ्या क्रमांकवर आहे. पाचव्या क्रमांकावर रत्नागिरी जेट्सचा विजय पावले आहे, ज्याने हंगामात 9 विकेट्स घेतल्या आहेत. एकंदरीत पाहता पुणेरी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पहिल्या वाच गोलंदाजांमध्ये पुणेरी बाप्पाचे तीन, कोल्हापूर टस्कर्सचा एक, तर रत्नागिरी जेट्सचा एक गोलंदाज आहे.
एमपीएल 2023च्या अंतिम सामन्याचा विचार केला, तर रत्नागिरी जेट्सने नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर टस्कर्सने 16 षटकांमध्ये 8 बाद 80 धावा केल्या. प्रत्युत्तरात विजयासाठी रत्नागिरी जेट्सला 81 धावा कराव्या लागणार होत्या. मात्र, पावसामुळे रत्नागिरी जेट्सला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. गुणलाकितेल रत्नागिरी पहिल्या, तर कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकवर असल्यामुळे रत्नागिरीला एमपीएल 2023चे विजेतेपद दिले गेले. कोल्हापूर संघ उपविजेता राहिला. (Top 5 bowlers with highest wicket takers in MPL 2023)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: रत्नागिरी जेट्सने उंचावली MPL 2023 ची ट्रॉफी! कोल्हापूर टस्कर्सच्या पदरी निराशा
VIDEO । ऑस्ट्रेलियन चाहत्यांवर मान खाली घालण्याची वेळ, लाबुशेननं खेळट्टीवर खाली वाकून काय केलं पाहाच