fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२००१ ते २०१० या काळात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू, सचिन आहे चक्क ५व्या स्थानावर

May 14, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसमुळे त्रस्त आहे. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रही ठप्प पडले आहेत. अशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल म्हणजे आयसीसी सोशल मीडियावर वेगवेगळे प्रयोग करत क्रिकेट चाहत्यांना व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आता आयसीसीने त्यांंच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून २००१ ते २०१० दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात मिळून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजी यादी जाहीर केली आहे.

२१व्या शतकाच्या पहिल्या दशकात म्हणजे १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०१० दरम्यान ज्या फलंदाजांच्या फळीने अफलातून कामगिरी करत सर्वाधिक धावा केल्या. अशा फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाचा समावेश आहे. पण, सचिन या यादीत पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर नाही तर ५व्या क्रमांकावर आहे.

मग नक्की असे कोणते क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी या १० वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रनमशीन सचिनलाही मागे टाकले आहे. तर जाणून घेऊयात.. Top 5 cricketer score between 2001 to 2010.

१. रिकी पाँटिंग (Ricky Ponting) :

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग हा २१व्या शतकाच्या पहिल्या दशकात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे. त्याने एकूण ३७८ सामने खेळत ४८.५६च्या सरासरीने १९७१८ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ५५ शतकांचा आणि १०६ अर्धशतकांचा समावेश होता.

२. कुमार संगाकारा (Kumar Sangakara) :

श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगाकारा २००१ ते २०१० दरम्यान सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३८४ सामन्यात ४४.१०च्या सरासरीने ३४ शतके आणि ९५ अर्धशतके मारत १७०६९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या सर्वाधिक २८७ धावांचा समावेश होता.

३. जॅक कॅलिस (Jacques Kallis) :

दक्षिण आफ्रिका संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस हा त्याच्या काळात संघातील यशस्वी क्रिकेटपटू होता. आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत त्याचा तिसरा क्रमांक आहे. त्याने २००१ ते २०१०मध्ये ३०८ सामन्यात १६७१२ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ४३ शतकांचा आणि ९८ अर्धशतकांचा समावेश होता. यावेळी त्याची फलंदाजी सरासरी ५४.०८ इतकी होती.

४. माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) :

श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेने आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत सचिनला मागे टाकले आहे. त्याने २१व्या शतकाच्या पहिल्या १० वर्षांत एकूण ३९२ सामने खेळले होते. यावेळी ४१.५०च्या सरासरीने त्याने ३४ शतकांच्या आणि ८३ अर्धशतकांच्या मदतीने १६२६९ धावा केल्या होत्या.

५. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) :

आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत सचिन ५व्या क्रमांकावर आहे. त्याने २००१ ते २०१० या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात मिळून २७७ सामन्यात ५२.४०च्या सरासरीने एकूण १५८२५ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ४५ शतकांचा आणि ७८ अर्धशतकांचा समावेश होता.

सचिन भारतीय संघात असताना त्याच्याबरोबर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचेही नाव घेतले जात असायचे. २००१ ते २०१० दरम्यान सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्यांचे नाव अनुक्रमे ६व्या आणि ७व्या क्रमांकावर दोन भारतीय खेळाडू आहेत. सेहवागने यावेळी ३२५ सामन्यात १५३४३ धावा केल्या होत्या. तर, द्रविडने ३०९ सामन्यात १५०२० धावा केल्या होत्या.

ट्रेंडिंग घडामोडी-

गरीबीमुळे एकवेळ फक्त मॅगी हेच अन्न होते, आज आहे मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू

एक खाणकामगाराचा मुलगा ते भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज

एकाच वनडेत शतक करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ३ भारतीय खेळाडू


Previous Post

एकाच वनडेत शतक करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ३ भारतीय खेळाडू

Next Post

तुम्हाला सांगू शकत नाही अशा गोष्टी आम्हाला विराट बोलायचा

Related Posts

Photo Courtesy:
Twitter/ICC
क्रिकेट

मोहम्मद हाफिजचा मोठा विक्रम! रोहित, गप्टिल यांचा समावेश असलेल्या ‘या’ खास यादीत झाला समावेश

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

तुम्हाला सांगू शकत नाही अशा गोष्टी आम्हाला विराट बोलायचा

सर्वाधिक वेळा पार्टनरला धावबाद करत तंबूचा रस्ता धरायला लावणारे फलंदाज

क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवलेल्या खेळाडूंची ड्रीम ११

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.