इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबर पासून यूएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी आपल्या १५ सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली आहे. तर या संघांतील बहुतांश खेळाडू आयपीएल स्पर्धेत सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कायरन पोलार्डने टी२० स्वरूपातील टॉप -५ खेळाडूंची निवड केली आहे.
१) ख्रिस गेल
कायरोन पोलार्डने टॉप -५ खेळाडूंच्या यादीत सर्वोच्च स्थानी युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलला स्थान दिले आहे. ख्रिस गेलबद्दल वेगळं असं काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच्या नावे टी२० क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे विक्रम आहेत. त्याने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७४ सामने खेळले असून, ज्यामध्ये त्याने १८५४ धावा केल्या आहेत. तसेच, टी२० क्रिकेटमध्ये त्याने ४४८ सामने खेळताना १४२७६ धावा केल्या आहेत. या स्वरूपात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सर्वोच्च स्थानी आहे.
२) लसिथ मलिंगा
श्रीलंका संघाचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला त्याने या यादीत दुसरे स्थान दिले आहे. मलिंगाने टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ८४ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला १०७ गडी बाद करण्यात यश आले.
३) सुनील नरीन
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरीनला त्याने या यादीत तिसरे स्थान दिले. सुनील नरीनने अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवले आहे. तसेच त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३७९ टी२० सामन्यात त्याने ४१९ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. यासह, तो टी२० क्रिकेटमध्ये तिसरा सर्वात जास्त गडी बाद करणार गोलंदाज आहे.
४) एमएस धोनी
पोलार्डने यष्टिरक्षक फलंदाज म्हणून माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीची निवड केली आहे. एमएस धोनीच्या नावे देखील टी२० क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठ्या विक्रमांची नोंद आहे. त्याच्या टी२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ३४४ सामन्यात ६९०५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने धोनीला ‘सर्वोत्कृष्ट फिनिशर’ची उपाधी देखील दिली.
५) कायरन पोलार्ड
पोलार्डने पाचव्या स्थानी स्वतःचीच निवड केली. त्याचे म्हणणे आहे की, टी२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे अनेक मोठ्या विक्रमांची नोंद आहे. पोलार्डच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ११,२२३ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने ३०० गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचे खास असूनही दुर्लक्ष, दुधातून माशी काढावी तसे ‘या’ ३ खेळाडूंना टी२० विश्वचषकातून ठेवले बाहेर
जमतंय जमतंय! धनश्रीच्या तालात ताल मिसळत पंजाबी गाण्यावर थिरकला चहल, व्हिडिओला चाहत्यांची पसंती
क्रिकेटपटू, यष्टीरक्षक आणि कर्णधारानंतर एमएस धोनी दिसणार अभिनेत्याच्या भूमिकेत? दिले ‘असे’ उत्तर