गेले दोन दिवस पाचव्या प्रो कबड्डी लीगचा दिल्ली येथे सुरु असलेला खेळाडूंचा लिलाव आज संपला. सेनालदलाच्याच नितिन तोमरने तब्बल 93 लाखांची किंमत मिळवताना वर्चस्व मिळवले होते. उत्तरप्रदेश संघाने त्याला काल खरेदी केले होते.
रेडर रोहित कुमारला लिलावात दुसऱ्या क्रमांकाची मोठी रक्कम मिळाली. त्याला बंगळुरु संघाने तब्बल ८१ लाख रुपये लिलावात मोजले.
२८ परदेशी खेळाडूंना या वर्षी संघमालकांनी संघात स्थान दिले. त्यातील जँग कुन ली (कोरिया) याला बंगाल संघने तब्बल ८० लाख ३० हजार रुपये मोजले. परदेशी खेळाडूंमध्ये तो सर्वात महागडा खेळाडू ठरला.
प्रो कबड्डी ५ मधील महागडे खेळाडू (किंमत लाखांमध्ये)
नितिन तोमर – यूपी (९३)
रोहित कुमार – बंगळुरु (८१)
जँग कुन ली (कोरिया) – बंगाल (८०.३)
मनजीत चिल्लर – जयपूर (७५.५)
सुरजीत सिंग – बंगाल (७३)
सेल्वामनी के. – जयपूर (७३)