लंडन। द ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकने कारकिर्दीतील 33 वे कसोटी शतक केले आहे.
या शतकाबरोबरच कूकने अनेक विक्रमही केले आहेत. हा सामना कूकचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना आहे. या सामन्यानंतर कूक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
तसेच कूक हा इंग्लंडचा कसोटीत सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा क्रिकेटपटू आहे.
त्याच्या या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने चौथ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत दुसऱ्या डावात 2 बाद 243 धावा केल्या असून 283 धावांची आघाडी घेतली आहे. तर कूक 101 धावांवर आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट 92 धावांवर नाबाद खेळत आहेत.
या सामन्यात अॅलिस्टर कूकने केले हे खास विक्रम-
1- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत कूक 31 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर. पहिल्या क्रमांकावर 33 शतकांसह सुनील गावस्कर.
2- कूक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा तिसऱ्या डावात शतक करणारा फलंदाज. त्याने 13 वेळा तिसऱ्या डावात केली आहे शतकी खेळी. त्याच्या पाठोपाठ 12 शतकांसह कुमार संगकारा.
3- एकाच प्रतिस्पर्धी विरुद्ध कसोटी पदार्पणाच्या आणि शेवटच्या सामन्यात शतक करणारा कूक तिसराच क्रिकेटपटू. याआधी रेगी डफ आणि बिल पॉन्सफोर्ड या क्रिकेटपटूंनी केला आहे असा पराक्रम
एकाच प्रतिस्पर्धी विरुद्ध कसोटी पदार्पणाच्या आणि शेवटच्या सामन्यात शतक करणारे क्रिकेटपटू-
रेगी डफ: (32, 104 धावा) आणि (146 धावा)(वि. इंग्लंड)
बिल पॉन्सफोर्ड: (110, 27 धावा) आणि (246, 22 धावा)(वि. इंग्लंड)
अॅलिस्टर कूक: (60, 104* धावा) आणि (71, 101* धावा)(वि. भारत)@Maha_Sports #म— Pranali Kodre (@Pranali_k18) September 10, 2018
4- पदार्पणाच्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात शतक करणारा कूक एकूण पाचवा क्रिकेटपटू. याआधी रेगी डफ, बिल पोन्सफोर्ड, ग्रेग चॅपेल आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी हा विक्रम केला आहे.
Reggie Duff (1902-1905)
Bill Ponsford (1924-1934)
Greg Chappell (1970-1984)
Mohammad Azharuddin (1984-2000)
Alastair Cook (2006-2018)Cook becomes just the fifth man to score a century in his first and last Tests! 🙌#ENGvIND #CookRetires #ThankYouChef pic.twitter.com/vU9T4alNix
— ICC (@ICC) September 10, 2018
5- कूकने श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या 12400 कसोटी धावांच्या विक्रमाला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये मिळवले स्थान.
कसोटीत सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू-
15921 धावा – सचिन तेंडुलकर
13378 धावा – रिकी पॉटिंग
13289 धावा – जॅक कॅलिस
13288 धावा – राहुल द्रविड
12428 धावा – अॅलिस्टर कूक*
12400 धावा – कुमार संगकारा#म #मराठी @Maha_Sports @MarathiRT @MarathiBrain #ENGvsIND #ThankYouChef
— Pranali Kodre (@Pranali_k18) September 10, 2018
6- अॅलिस्टर कूक एकाच प्रतिस्पर्धी विरुद्ध कसोटी पदार्पणाच्या आणि शेवटच्या सामन्यात 100 पेक्षा जास्त धावा करणारा चौथा क्रिकेटपटू
7- 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये पहिल्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच शतक करणारा कूक पहिलाच खेळाडू.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–नोवाक जोकोविच तिसऱ्यांदा युएस ओपनचा विजेता
–Video: धाव घेताना केएल राहुलचा निघाला शुज; बेन स्टोक्सने केली मदत
–पदार्पणातच अर्धशतक करणारा हनुमा विहारी द्रविड, गांगुलीच्या यादीत सामील