-सचिन अमुनेकर
भारत म्हणजे क्रिकेटवेडा देश! असा देश जेथे प्रत्येक घरातील मुलगा वयाच्या १५ व्या वर्षीपर्यंत क्रिकेटर व्हायची स्वप्ने पाहतो. इथे लहानातल्या लहान मुलाला क्रिकेटबद्दल इत्यंभूत माहिती असते. मोठ्यांबद्दल तर विचारायलाच नको. भले करियर कोणतही असो, पण आजही भारताचा सामना चालू असताना हमखास टीव्ही समोर जाऊन बसणार आणि सामना संपल्यावरच उठणार.
याच डेडिकेशनमुळे त्यांना देखील क्रिकेट मधील खडानखडा माहिती असते. तरीही काही नियम असे असतात जे क्रिकेट चाहत्यांना माहित नसतात. चला तर मग जाणून घेऊया क्रिकेट जगतातील असे अतरंगी नियम जे तुम्ही आजवर कधीही ऐकले नसतील..!
७. टाईम आउट
विकेट पडल्यावर जर पुढचा फलंदाज तीन मिनिटांच्या आत आला नाही, तर विरोधी टीमच्या अपीलनुसार पंच त्या बॅट्समनला बाद ठरवू शकतात. या नियमाशी निगडीत एक प्रसंग सचिन तेंडूलकरसोबत घडला होता, परंतु त्याला बाद देण्यात आले नाही, कारण कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सचिन हा १८ मिनिटांसाठी फिल्डवर नव्हता.
क्रिकेटमधील आणखी एका नियमानुसार जर एखादा क्षेत्ररक्षक ८ मिनिटांपेक्षा जास्त वेळ फिल्डच्या बाहेर गेला तर जेवढ्या वेळासाठी तो फिल्डच्या बाहेर आहे तेवढ्या वेळासाठी तो फलंदाजी वा गोलंदाजी करू शकत नाही. ही गोष्ट सचिनच्या बरोबर लक्षात होती, परंतु इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आली नाही आणि चौथ्यादिवशी सामना सुरु झाल्यावर अवघ्या १३ मिनिटांमध्ये भारताचे २ विकेट्स गेले. आदल्या दिवशी सचिन १८ मिनिटांसाठी फिल्ड बाहेर होता, त्यामुळे त्याला अजून ५ मिनिटे फिल्ड बाहेर राहणे भाग होते. सर्वजण सचिन कधी फलंदाजीला जातो याची वाट पाहत राहिले. परंतु सचिन काही फलंदाजीला आला नाही. अखेर सौरव गांगुलीच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर तो त्वरेने तयार झाला आणि स्वत: फलंदाजीसाठी उतरला. दक्षिण आफ्रीकेचा कॅप्टन स्मिथचे येथे कौतुक करायला हवे, त्याने जर पंचांककडे अपील केले असते तर कदाचित सचिनच्या नंतर आलेला गांगुली टाईम आउट नियमाप्रमाणे बाद आहे असे अपील तो करू शकला असता पण त्याने तसे केले नाही.
६. लॉस्ट बॉल
जर मॅच खेळताना चेंडू हरवला तर क्षेत्ररक्षण करणारा संघ पंचांकडे लॉस्ट बॉलची आपली करू शकते. या अपीलनुसार अम्पायर तो चेंडू ‘डेड बॉल’ घोषित करू शकतो.
५. हेल्मेट कनेक्शन
जर झेल पकडते वेळी चेंडू क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूच्या कोणत्याही प्रोटेक्टिव वस्तूला (हेल्मेट, पॅड, एल्बो गार्ड, कॅप) स्पर्श करून गेली आणि त्या नंतर त्याने झेल घेतली तर फलंदाजाला बाद दिले जात नाही.
४ पंचांची परवानगी न घेता बाहेर गेलात तर ५ धावा अतिरिक्त
जखमी झाल्यावर एखादा क्षेत्ररक्षक जर पंचांची परवागनी घेतल्याशिवाय फिल्डच्या बाहेर गेला तर फलंदाजी करणाऱ्या संघालाला ५ अतिरिक्त धावा दिल्या जातात.
३ एकापेक्षा जास्त वेळ चेंडू मारण्याचा प्रयत्न न करणे
गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने मुद्दामहून एकाच वेळेस दोनदा मारण्याचा प्रयत्न केला तर त्याला बाद दिले जाते.
२ स्पायडर कॅम आणि चेंडूचे कनेक्शन
जर फलंदाजाने मारलेला चेंडू फिल्डवर घिरट्या घालणाऱ्या स्पायडर कॅमेराला जाऊन आदळला तर तो डेड बॉल घोषित करण्यात येतो. त्यावर फलंदाजाला धावा मिळत नाहीत किंवा जर मैदानाला छत असेल आणि त्यावर जाऊन जरी चेंडू आदळला तर त्यावरही फलंदाजाला धावा मिळत नाहीत. तो चेंडू ‘डेड बॉल’ घोषित केला जातो.
१. हेल्मेट मिळवून देणार धावा
फटका मारल्यावर जर चेंडू विकेटीकीपरने फिल्डवर ठेवलेल्या हेल्मेटला जाऊन आदळला तर फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ अतिरिक्त धावा दिल्या जातात.
सर्वाधिक चर्चेतील लेख-
–क्रिकेट जगतातील ५ महान खेळाडू, जे झाले होते वाॅटरबाॅय
–ती अजरामर खेळी झाली नसती तर गांगुली कधी क्रिकेटर म्हणून दिसलाच नसता
–४९ वर्षांपूर्वी गॅरी सोबर्समुळे एका तरुणाला मुंबईत मिळाली होती नोकरी…
–का सचिनचा आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना भारतीयांना पाहता आला नव्हता?