शुक्रवारचा दिवस (१५ ऑक्टोबर) आयपीएलप्रेमींसाठी अविस्मरणीय राहिला. या दिवशी आयपीएल २०२१ ला विजेता संघ मिळाला आहे. दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात या हंगामातील अंतिम सामना रंगला होता. चेन्नईने २७ धावांनी हा सामना जिंकत पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. चेन्नई संघाला हे यश मिळवून देण्यात संघातील जवळपास सर्वच खेळाडूंचे योगदान राहिले. परंतु काही खेळाडू पूर्ण हंगामात आपले सर्वोत्कृष्ट देत संघासाठी मॅच विनर ठरले आहेत.
चेन्नई संघातील गोलंदाजांच्या प्रदर्शनावर प्रकाश टाकायचा झाल्यास, शार्दुल ठाकूरने या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. बऱ्याचशा सामन्यांमध्ये त्याने तो चेन्नईसाठी गें चेंजर ठरला आहे. शार्दुलबरोबरच दिपक चाहर, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा या खेळाडूंनीही संघाला महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या आहेत. याच गोलंदाजांच्या कामगिरीवर नजर टाकूया
चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
१. शार्दुल ठाकूर- २१ विकेट्स, १६ सामने-
चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. तर चेन्नई संघाकडून तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने १६ सामन्यात २५.०९ च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामातील त्याची २८ धावा देत ३ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
२. दिपक चाहर- १४ विकेट्स, १५ सामने-
वेगवान गोलंदाज दिपक चाहर यानेही चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. आपल्या भेदक गोलंदाजीने त्याने त्याने या हंगामात एकूण १४ विकेट्स चटकावल्या आहेत. यादरम्यान १३ धावांवर ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
३. ड्वेन ब्रावो- १४ विकेट्स, ११ सामने-
अष्टपैलू ड्वेन ब्रावो यानेही दिपक चाहरच्या बरोबरीने आयपीएल २०२१ मध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. ११ सामने खेळताना त्याने या विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान २४ धावांवर ३ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
४. रविंद्र जडेजा- १३ विकेट्स, १६ सामने-
रविंद्र जडेजाने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही चेन्नई संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने आयपीएल २०२१ मध्ये १३ धावांवर ३ विकेट्सच्या सर्वोत्तम कामगिरीसह १३ विकेट्स काढल्या आहेत.
५. जोश हेडलवुड- ११ विकेट्स, ९ सामने-
या वेगवान गोलंदाजाला आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून जास्त सामने खेळायची संधी मिळाली नाही. परंतु मिळालेल्या संधीतच त्याने विरोधी संघातील फलंदाजांची भंबेरी उडवली. ९ सामन्यांमध्ये चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ११ विकेट्स खात्यात नोंदवल्या आहेत. यादरम्यान २४ धावांवर ३ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जिथे जाऊ, तिथे आमचाच बोलबाला! आयपीएल २०२१मध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारे ५ खेळाडू
आयपीएल २०२१ विजेत्या सीएसकेसाठी रनमशीन ठरलेत ‘हे’ ५ धुरंधर, पुणेकर ऋतुराजने तर कहरचं केलाय
सनरायझर्सकडून दुर्लक्षित राहिलेल्या वॉर्नरची चेन्नईवर नजर! ट्रॉफी जिंकल्यानंतर बांधले कौतुकाचे पुल