वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना अमेरिकेतील सुरू झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल केले गेले आहेत.
https://twitter.com/BCCI/status/1555929619333017601?t=g9wHo-B0PzYLGd-I4tb-LA&s=19
मालिकेत भारतीय संघ २-१ असा आघाडीवर आहे. फ्लोरिडा येथील या चौथ्या सामन्याला पावसामुळे ४५ मिनिटे उशिर झाला. तिसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला कर्णधार रोहित शर्मा या सामन्यासाठी उपलब्ध होता. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल केले गेले. खराब फॉर्ममध्ये असलेला श्रेयस अय्यर, उपकर्णधार हार्दिक पंड्या व अनुभव फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती दिली गेली. त्यांच्या जागी संजू सॅमसन, दीपक हुडा व अक्षर पटेल यांची वर्णी लागली.
दुसरीकडे वेस्ट इंडीजने या सामन्यासाठी आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. त्यांनी तिसऱ्या सामन्यातील संघ कायम ठेवला. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल. तर यजमान वेस्ट इंडीज विजयासह शेवटचा सामना निर्णायक बनवण्याच्या प्रयत्नात असेल. मालिकेतील अखेरचा सामना लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ ऑगस्ट रोजी याच मैदानावर खेळला जाईल.
असे आहेत दोन्हीही संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
वेस्ट इंडिज: ब्रेंडन किंग, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, निकोलस पूरन (यष्टीरक्षक/कर्णधार), कायले मेयर्स, जेसन होल्डर, अकिल होसेन, डॉमिनिक ड्रेक्स, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅकॉय, डेवॉन थॉमस.