---Advertisement---

धावांमध्ये अव्वल ठरलेल्या रोहितने ‘हा’ नकोसा विक्रमही केला नावावर

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2020 8:48 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये आयपीएलचा १३वा सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार केला. असे करताना एक नकोसा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सुर्यकुमार यादव धावबाद झाला. यावेळी दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा उभा होता. सुर्यकुमारला या सामन्यात मोहम्मद शमीने धावबाद केले.

याच आयपीएल स्पर्धेत रोहित शर्माच खेळपट्टीवर असताना सुर्यकुमार यादवच धावबाद झाला होता. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात २३ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात सुर्यकुमारला ऑयन मॉर्गन व सुनिल नारायण यांनी मिळीून धावबाद केले होते.

२०१६ ते २०१९ अशा ४ हंगामात खेळपट्टीवर असलेला रोहितचा पार्टनर खेळाडू केवळ एकवेळा धावबाद झाला होता. परंतू आयपीएल २०२०मध्ये मुंबईचे केवळ ३ सामने झाले असताना रोहितचा पार्टनर खेळाडू दोन वेळा धावबाद झाला आहे. विशेष म्हणजे तो खेळाडू सुर्यकुमार यादव हा एकटाच आहे.

रोहितने केला ५ हजार धावांचा टप्पा पार- 
मुंबईकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या रोहितने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीला खणखणीत चौकार मारत एक खास विक्रम केला. तो आयपीएलमध्ये ५ हजार धावा करणारा तिसरा खेळाडू झाला.

यापुर्वी सुरेश रैनाने २३ मार्च २०१९ रोजी ५ हजार धावांचा टप्पा पार केला होता. तर विराट कोहलीने २८ मार्च २०१९ रोजी हा कारनामा केला होता. रोहितने १९२ आयपीएल सामन्यात ३१.७२च्या सरासरीने ५०१३ धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी असून त्याने १८० सामन्यात ५४३० तर सुरेश रैनाने १९३ सामन्यात ५३६८ धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---