बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा भारतासाठी डोकेदुखी ठरला. त्यानं भारताविरुद्ध 115 चेंडूत सलग दुसरं शतक झळकावलं. या शतकासह ट्रॅव्हिस हेडनं एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा विक्रम करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला!
ट्रॅव्हिस हेडनं 69व्या षटकात 115 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. तो 160 चेंडूत 152 धावा करून हेड बाद झाला. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 95 एवढा होता. जसप्रीत बुमराहनं त्याला पंतच्या हाती झेलबाद केलं. हेडनं आपल्या खेळीत 18 चौकार मारले. हे शतक ठोकताच ट्रॅव्हिस हेडनं गाबाच्या मैदानावर अनोखा विक्रम केला आहे.
वास्तविक, हेड एका कॅलेंडर वर्षात एकाच मैदानावर किंग पेअर (दोन्ही डावात गोल्डन डक) आणि शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. क्रिकेटच्या इतिहासात हा पराक्रम यापूर्वी कधीही घडला नव्हता. यामुळे हेडचं नाव क्रिकेट इतिहासात नोंदवलं गेलं आहे.
2024 च्या सुरुवातीला गाबा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटीत ट्रॅव्हिस हेड दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. पहिल्या डावात केमार रोचनं त्याला शून्यावर बाद केलं होतं, तर दुसऱ्या डावात शामर जोसेफनं त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केलं. वेस्ट इंडिजने हा सामना आठ धावांनी जिंकला. आता त्यानं भारताविरुद्ध पहिल्या डावात शतक ठोकलं.
विशेष म्हणजे, गाबा मैदानावर ट्रॅव्हिस हेड शेवटच्या तीन डावांमध्ये ‘गोल्डन डक’ (पहिल्याच चेंडूवर बाद) झाला होता. मात्र त्यानं भारताविरुद्ध आपला रेकॉर्ड कायम ठेवत शानदार शतक झळकावलं. तो सध्या या मालिकेत दोन शतकांसह सर्वाधिक 392 धावा करणारा खेळाडू आहे.
हेही वाचा –
‘वन मॅन आर्मी’..! बुम-बुमचा पुन्हा एकदा पंजा, गाबा कसोटीत जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी
स्टीव्ह स्मिथचा कमबॅक, तब्बल इतक्या दिवसांनंतर ठोकलं कसोटी शतक!
रिषभ पंतचा गाबा कसोटीत ऐतिहासिक विक्रम, अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा भारतीय यष्टीरक्षक