ट्रॅव्हिस हेडनं या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सलग दोन शतकं झळकावली आहेत. मात्र त्यानंतर आता त्याच्या दुखापतीच्या बातम्या येत आहेत. गाबामध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत हेड थोडा अस्वस्थ दिसला होता. यानंतर त्यानं मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीच्या सराव सत्रात भाग घेतला नाही. त्यामुळे हेड पुढच्या कसोटीत खेळणार की नाही या चर्चेला जोर आला.
गाबा कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना हेड अडखळताना दिसला होता. यानंतर त्यानं सोमवारी झालेल्या सराव सत्रात भाग घेतला नाही. गाबा कसोटीच्या पाचव्या दिवशी हेडनं क्षेत्ररक्षणही केलं नाही. मात्र हेडनं कसोटीनंतर सांगितलं होतं की मला फक्त वेदना होत आहेत आणि तो 26 डिसेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत परतणार आहे.
‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’नुसार, हेड मंगळवारी आपला फिटनेस सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. या अहवालात प्रामुख्यानं सराव सत्राला उपस्थित न राहणं अधोरेखित केलंय. मात्र, सराव सत्र ‘ऐच्छिक’ असल्याचंही सांगण्यात आलं. ऑस्ट्रेलियाच्या मुख्य प्रशिक्षकाचा हवाला देत अहवालात म्हटलं आहे की, ट्रॅव्हिस हेड बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्याची शक्यता आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये हेडची बॅट चांगलीच तळपली आहे. त्यानं या मालिकेत आतापर्यंत 81.2 च्या सरासरीनं 409 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्यानं दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 152 धावा आहे.
बॉर्डर-गावस्कर मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत टीम इंडियानं 295 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं 10 गडी राखून विजय मिळवला. यानंतर गाबा येथे खेळली गेलेली मालिकेतील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली.
हेही वाचा –
विराट कोहली ऑफ स्टंप लाईनवर वारंवार आऊट का होतो? कर्णधारानं दिलं मजेशीर उत्तर
कुलदीप, अक्षरच्या आधी तनुष कोटियनचा टीम इंडियात का प्रवेश? रोहित शर्माने सांगितले मोठे कारण
चॅम्पियन्स ट्राॅफी पूर्वी इंग्लंडला धक्का! कसोटी कर्णधार बेन स्टोक्स गंभीर दुखापती